फोटो सौजन्य : झी मराठी इन्स्टाग्राम
कृष्णाईच्या लेकी मालिकेचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून निवेदिता सराफ यात मुख्य भुमिकेत असणार आहे. कृष्णाईच्या लेकी या मालिकेत एक संघर्ष करणारी स्त्री जिने आपल्या लेकींसाठी सगळ्याचा त्याग केला. कृष्णाई म्हणते की, “तुम्हाला म्हणून सांगते… मी लहानपणापासून ऐकलंय, चूल अन् मूल बाईकडं… आणि घराची जबाबदारी पुरुषाकडे! पण, माझ्या नशिबाचा डाव पलटला… वंशाला दिवा नाही म्हणून नवऱ्याने हात झटकला. त्या दिवसापासून माझ्या लेकींची आई पण मीच आणि बाप सुद्धा मी! त्यांना सांगितलं पाहिजे हवं तेवढं शिका आणि जगात ताठ मानेने जगा… कोणीतरी सांगितलंय पोटची बेटी धनाची पेटी, ज्याला समजली त्याने मनापासून जपली.”
झी टीव्हीवरीवरील हिंदी मालिका गंगामाई की बेटियाँ या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक करण्यात येत आहे. ‘गंगामाई की बेटियाँ ‘ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये शेझान खान, शुभांगी लाटकर आणि इंदिरा कृष्णन यांचा समावेश आहे. या मालिकेने नुकतेच 200 भाग पूर्ण करण्याचा टप्पा गाठला असून तिला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही हिंदी मालिका सध्या टीआरपीमध्ये देखील चर्चेत आहे. या मालिकेच्य़ा मराठीत करण्यात येणाऱ्या रिमेकला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल हे लवकरच कळेल.
Tharala Tar Mag : सायलीच तन्वी असल्याचं सत्य होणार का उघड? ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट






