Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आनंदी’ मालिकेत जाई खांडेकरचा अनोखा अवतार; जिवंत शिल्पासाठी घेतली तब्बल ४ तासांची मेहनत

स्टार प्रवाहवरील ‘आनंदी’ मालिकेत लवकरच एक अनोखा आणि लक्षवेधी प्रसंग पाहायला मिळणार आहे. युगंधरची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आनंदी स्वतःच जिवंत शिल्प बनण्याचा धाडसी निर्णय घेते. हा लूक साकारण्यासाठी अभिनेत्री जाई खांडेकरला तब्बल चार तास मेकअप करावा लागला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 04, 2026 | 08:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रेक्षकांना एक वेगळाच आणि लक्षवेधी प्रसंग पाहायला मिळणार आहे.
  • सूक्ष्म मेकअपच्या सहाय्याने जाईला हुबेहूब मूर्तीसारखा लूक देण्यात आला.
  • या प्रश्नांची उत्तरे आगामी भागांमध्ये मिळणार असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आनंदी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून कथानकातील रंजक घडामोडींमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री जाई खांडेकर साकारत असलेली आनंदी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. आनंदी आणि युगंधरच्या लग्नानंतर मालिकेच्या कथानकात अनेक नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता आगामी भागात प्रेक्षकांना एक वेगळाच आणि लक्षवेधी प्रसंग पाहायला मिळणार आहे.

1.5 बिलियनचा तुटवडा म्हणजे नेमकं काय? मनोज बाजपेयींचा रंजक खुलासा; भूमिकेसाठी केली ‘ही’ खास तयारी

मालिकेच्या कथेनुसार, युगंधरने पॅरिसहून आलेल्या खास पाहुण्यांसाठी एक दुर्मीळ आणि आकर्षक मूर्ती आणलेली असते. मात्र, आनंदीच्या हातून ही मूर्ती चुकून फुटते. या घटनेमुळे युगंधरची पाहुण्यांसमोर प्रतिमा खराब होऊ नये आणि त्याच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आनंदी एक धाडसी निर्णय घेते. फुटलेल्या मूर्तीच्या जागी ती स्वतःच जिवंत शिल्प बनून उभी राहण्याचे ठरवते.

हा प्रसंग पडद्यावर वास्तववादी आणि प्रभावी दिसावा यासाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली आहे. जाई खांडेकरला जिवंत शिल्पाचा लूक देण्यासाठी तब्बल चार तासांचा वेळ लागला. त्वचेला कोणतीही हानी होऊ नये यासाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार विशेष स्किन-फ्रेंडली रंगांचा वापर करण्यात आला. बॉडी पेंटिंग, वेशभूषा आणि सूक्ष्म मेकअपच्या सहाय्याने जाईला हुबेहूब मूर्तीसारखा लूक देण्यात आला.

या खास प्रसंगाबद्दल बोलताना जाई खांडेकरने तिचा अनुभवही शेअर केला. ती म्हणाली, “आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका आणि प्रसंग साकारले आहेत, पण जिवंत शिल्प बनण्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा होता. जवळपास चार तास सलग मेकअपसाठी बसावं लागलं. त्यानंतर शूटिंगदरम्यान बराच वेळ एकाच जागी स्थिर उभं राहणंही मोठं आव्हान होतं. मात्र, प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.”

Cockroach Janta Party ला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं समर्थन! राजकारणात सक्रिय, म्हणाले ‘आंदोलनातही होणार सहभागी’

जाईच्या या हटके लूकमागे केवळ मेकअपच नव्हे, तर संपूर्ण तांत्रिक टीमची मेहनतही दिसून येते. कलाकार आणि तंत्रज्ञांच्या समन्वयातून हा प्रसंग अधिक प्रभावी बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा भाग मालिकेतील महत्त्वाच्या आणि लक्षवेधी प्रसंगांपैकी एक ठरणार असल्याची चर्चा आहे. आता आनंदीचा हा त्याग युगंधरची प्रतिष्ठा वाचवू शकेल का? तसेच या घटनेनंतर कथेला कोणते नवे वळण मिळेल? या प्रश्नांची उत्तरे आगामी भागांमध्ये मिळणार असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title: How jay khandekar played the role of putala in the series anandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • latest movies
  • Marathi Schools

संबंधित बातम्या

Deoolband 2 : पत्नीला काम देणे म्हणजे Nepotism? अखेर व्यक्त झाला प्रवीण तरडे; म्हणाला ‘ज्याची लायकी…’
1

Deoolband 2 : पत्नीला काम देणे म्हणजे Nepotism? अखेर व्यक्त झाला प्रवीण तरडे; म्हणाला ‘ज्याची लायकी…’

मराठीतील पहिल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात! ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय रहस्य आणि थराराचा अनोखा प्रवास
2

मराठीतील पहिल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात! ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय रहस्य आणि थराराचा अनोखा प्रवास

‘द पिरॅमिड स्कीम’मधून अल्फिया जाफरीचे दमदार पदार्पण; अरुणाभ कुमार यांना म्हटले सर्वात मोठा आधारस्तंभ
3

‘द पिरॅमिड स्कीम’मधून अल्फिया जाफरीचे दमदार पदार्पण; अरुणाभ कुमार यांना म्हटले सर्वात मोठा आधारस्तंभ

‘मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी’ वेब सीरिजला हमदर्द लॅबोरेटरीजचे सह-प्रायोजकत्व! 
4

‘मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी’ वेब सीरिजला हमदर्द लॅबोरेटरीजचे सह-प्रायोजकत्व! 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.