
फोटो सौजन्य - Social Media
सध्या भारतात सिनेचाहत्यांना ‘मटका किंग’ या Web Series ची प्रतीक्षा आहे. या वेब सिरीजमध्ये अभिनेता Vijay Verma मुख्य भूमिकेत झळकणार आहे. वेब सिरीजचा ट्रेलर सध्या धुमाकूळ घालत आहे आणि सिनेचाहत्यांच्या पसंतीस येत आहे. मराठी प्रेक्षकांना Matka King या वेब सिरीजची जरा जास्तच ओढ आहे कारण या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आहेत. या वेब सीरिजच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात दिग्दर्शक नागराज मंजुळेंसह मुख्य पात्र साकारणारा विजय वर्मा तसेच मालिकेतील इतर कलाकार (सई ताम्हणकर, कृतिका कामरा तसेच गुलशन ग्रोवर) उपस्थित होते.
Matka King Trailer Launch सोहळ्यात विजय वर्माने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे कौतुक केले आहे. कौतुक करताना तो म्हणतो की,”नागराज मंजुळेंसोबत काम करणं हे माझं स्वप्न होतं. जेव्हा त्यांनी मला मटका किंगसाठी विचारलं तेव्हा खरं तर मला विश्वासच बसत नव्हता. कारण त्यांच्या चित्रपटासाठी एखाद्या अभिनेत्याची गरजच नसते. त्यांनी फँड्री, सैराट सिनेमात कलाकार नसलेल्या व्यक्तींना कास्ट केलं होतं.” विजय वर्माने नागराज यांनी संधी दिल्यामुळे त्यांचे आभार मानले. नागराज मंजुळे सहसा त्यांच्या चित्रपटासाठी अभिनेत्यांची निवड करत नाहीत. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा फॅन्ड्री यामध्ये जब्याचे (मुख्य पात्र) पात्र साकारणारा सोमनाथ अवघडे तसेच सैराट चित्रपटातील बहुतेक पात्र यातील कुणीही प्रोफेशनने अभिनय क्षेत्रातील नव्हता. नागराज मंजुळे यांचा हिंदी सिनेमा ‘झुंड’ यामध्येदेखील निवडण्यात आलेले कलाकार प्रोफेशनल नव्हते. तरीही त्यांनी त्यांच्याकडून अभिनय करून घेतला याचे कौतुक नेहमीच भारतीय सिनेक्षेत्रात होत असते.
पुढे म्हणताना विजय म्हणतो की, “अभिनय माहीत नसलेले कलाकारदेखील त्यांच्या सिनेमात चांगलं काम करू शकतात. म्हणूनच ते आपल्याकडे असलेल्या चांगल्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत.” Matka King Web Series मध्ये अनेक मराठी कलाकार दिसून येणार आहेत. या वेब सिरीजमध्ये सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, गिरीश कुलकर्णी तसेच किशोर कदम झळकणार आहेत. Web Series चे दिग्दर्शन Nagraj Manjule यांनी केले आहे, तर लेखन Abhay Koranne यांनी केले आहे. मटका किंग 17 April रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित केले जाणार आहे.