Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युनानी की कहाणी’ हा माहितीपट डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित! ‘समग्र आणि व्यापक मांडणी’

जागतिक युनानी दिनानिमित्त ‘युनानी की कहाणी’ हा माहितीपट डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित करण्यात आला. जिम सर्भ यांच्या निवेदनातून युनानी उपचारपद्धतीची समग्र आणि व्यापक मांडणी करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 12, 2026 | 07:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक युनानी दिनानिमित्त अभिनेता जिम सर्भ यांच्या प्रभावी निवेदनासह साकारलेला ‘युनानी की कहाणी’ हा विशेष माहितीपट डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित करण्यात आला. युनानी उपचारपद्धतीकडे केवळ पारंपरिक औषधप्रणाली म्हणून न पाहता, आरोग्याकडे पाहण्याची एक व्यापक आणि समग्र दृष्टी म्हणून या माहितीपटातून मांडणी करण्यात आली आहे.

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढती आजारपणं, मानसिक ताण आणि अपूर्ण उपचारपद्धतींच्या पार्श्वभूमीवर युनानी वैद्यकशास्त्राची उपयुक्तता अधोरेखित करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. हमदर्द लेबोरेटरीजच्या सहकार्याने तयार झालेल्या या माहितीपटात प्राचीन ग्रीसमध्ये उदयास आलेल्या आणि भारतात विकसित झालेल्या युनानी उपचारपद्धतीचा ऐतिहासिक प्रवास उलगडण्यात आला आहे. ‘खरं निरोगी असणं म्हणजे नेमकं काय?’ आणि ‘आपण केवळ लक्षणांवर उपचार का करतो?’ यांसारखे मूलभूत प्रश्न उपस्थित करत हा माहितीपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. युनानी उपचारपद्धती शरीर, मन, आत्मा आणि पर्यावरण यांच्यातील संतुलनाला आरोग्याचा पाया मानते. त्यामुळे आजार वेगळा करून पाहण्याऐवजी शरीरातील समतोल पुनर्स्थापित करण्यावर भर दिला जातो.

कोविड-१९ महामारीच्या काळात भारताने आधुनिक वैद्यकशास्त्रासोबतच पारंपरिक उपचारपद्धतींकडेही पुन्हा वळून पाहिले. या पार्श्वभूमीवर युनानी वैद्यकशास्त्राचे महत्त्व अधिक स्पष्ट होते, याची जाणीव हा माहितीपट करून देतो. जिम सर्भ यांचा आधुनिक, जिज्ञासू आणि प्रभावी निवेदनशैली माहितीपटाला वेगळे परिमाण देते. त्यांच्या आवाजातून विषयाची सखोल आणि समतोल मांडणी प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचते.

हमदर्द लेबोरेटरीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग ट्रस्टी अब्दुल मजीद यांनी सांगितले की, “हा माहितीपट उपचारपद्धतीकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न आहे. संतुलन, प्रतिबंध आणि दीर्घकालीन आरोग्य यावर भर देत युनानीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे.” अभिनेता जिम सर्भ यांनीही हा अनुभव शिकण्यासारखा असल्याचे सांगितले. इतिहास, संस्कृती आणि संतुलित जीवनशैली यांचा संगम युनानी पद्धतीत कसा दिसतो, यामुळे आपण प्रभावित झालो, असे त्यांनी नमूद केले.

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

माहितीपटात हिप्पोक्रेट्स, इब्न सिना, तसेच भारतातील हकीम अजमल खान, हाफिज अब्दुल मजीद आणि हकीम अब्दुल हमीद यांच्या योगदानाचाही आढावा घेण्यात आला आहे. विविध संस्कृतींच्या प्रभावातून विकसित झालेली ही उपचारपद्धती आजही सुसंगत असल्याचे यातून अधोरेखित होते. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक आरोग्यव्यवस्था यांचा समतोल साधण्याचा संदेश देणारा ‘युनानी की कहाणी’ हा माहितीपट विशेषतः तरुण प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: The documentary unani ki kahani aired on discovery channel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 07:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.