• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • India First Adas Test City In Mavals Tanks India Vehicle Technology

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित ARAI ने सुमारे २० एकर क्षेत्रावर हे अत्याधुनिक केंद्र विकसित केले. भारतीय रस्ते व वाहतूक परिस्थिती लक्षात घेऊन उभारण्यात आलेली ही देशातील पहिली ‘स्मार्ट ॲडास टेस्ट सिटी’ आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 12, 2026 | 06:36 PM
India first Adas Test City in Maval's tanks India vehicle technology

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ॲडास टेस्ट सिटी’ निर्माण झाली आहे (फोटो- टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुक्यातील टाकवे येथे देशातील पहिली ‘ॲडास (ADAS – Advanced Driver Assistance Systems) टेस्ट सिटी’ साकारण्यात आली असून, यामुळे भारताच्या वाहन तंत्रज्ञान क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले गेले आहे. (Maval News) ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक केंद्राचे सादरीकरण ‘ॲडास शो २०२६’च्या माध्यमातून वाहन उद्योग प्रतिनिधी व पत्रकारांसमोर करण्यात आले. (Pune News)

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या ARAI ने सुमारे २० एकर क्षेत्रावर हे अत्याधुनिक केंद्र विकसित केले आहे. भारतीय रस्ते व वाहतूक परिस्थिती लक्षात घेऊन उभारण्यात आलेली ही देशातील पहिली ‘स्मार्ट ॲडास टेस्ट सिटी’ आहे. या केंद्रामध्ये ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीमसाठी सुरक्षित, नियंत्रित व पुनरावृत्तीयोग्य चाचणी वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे वाहन उत्पादकांना भारतीय परिस्थितीनुसार त्यांच्या तंत्रज्ञानाची अचूक पडताळणी व प्रमाणिकरण करणे अधिक सुलभ होणार आहे.

हे देखील वाचा : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास

ही सुविधा सिम्युलेशन, क्लोज्ड ट्रॅक टेस्टिंग तसेच सार्वजनिक रस्त्यांवरील चाचण्यांमधील दरी कमी करण्याचे महत्त्वाचे कार्य करणार आहे. परिणामी वाहन सुरक्षेत वाढ होऊन अपघात कमी करण्यास तसेच भविष्यातील स्मार्ट मोबिलिटीला चालना मिळणार आहे. ‘ॲडास शो २०२६’चे आयोजन ARAI च्या सहकार्याने करण्यात आले असून, या कार्यक्रमाला वरिष्ठ सरकारी अधिकारी, देश-विदेशातील वाहन उत्पादक, तंत्रज्ञ, संशोधक तसेच टियर-१ पुरवठादार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ARAI चे संचालक डॉ. रेगी मथाई, मोबिलआयचे उपाध्यक्ष एली लुस्किन, एचएआर टेक्नॉलॉजीजचे अभिजित सेनगुप्ता तसेच ARAI संस्थेचे सदस्य फरीद अहमद यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. रेगी मथाई यांनी सांगितले की, ॲडास तंत्रज्ञान रस्ते सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार असून सुरक्षित, स्मार्ट आणि शाश्वत गतिशीलतेकडे वाटचाल करण्याच्या ARAI च्या वचनबद्धतेचे हे केंद्र प्रतीक आहे. ‘कॅपिटल गुड्स’ योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या पाठबळामुळे या प्रकल्पाची उभारणी शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. या ‘ॲडास शो २०२६’मध्ये ऑटोमॅटिक क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ट्रॅफिक साइन रिकग्निशन, ड्रायव्हर मॉनिटरिंग, पादचारी शोध, नाईट व्हिजन, ट्रॅफिक जॅम असिस्ट व ऑटोमॅटिक पार्किंग यांसारख्या अत्याधुनिक प्रणालींची थेट प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

हे देखील वाचा : डॉलर्सच्या अतिरिक्त आयातीबद्दल सरकार अस्पष्ट; Trade Deal खरंच फायद्याची की तोट्याची?

वडगाव मावळजवळ टाकवे परिसरात उभारण्यात आलेल्या या ॲडास टेस्ट सिटीमुळे भारताला ॲडास विकास व प्रमाणिकरण क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडी घेण्याची संधी मिळणार आहे. याचा थेट फायदा भारतीय वाहन उत्पादक, संशोधक तसेच भविष्यातील स्मार्ट मोबिलिटीला होणार आहे. या प्रकल्पामुळे मावळ तालुका आणि पुणे जिल्हा देशाच्या वाहन तंत्रज्ञान नकाशावर ठळकपणे अधोरेखित झाला असून, स्थानिक पातळीवर रोजगार, संशोधन आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.

Web Title: India first adas test city in mavals tanks india vehicle technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • maval news
  • pune news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
1

जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक
2

Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक

पुण्यात पावणे तीन हजार फटाका सायलेन्सरवर कारवाई; कर्णकर्कश आवाज कमी होणार?
3

पुण्यात पावणे तीन हजार फटाका सायलेन्सरवर कारवाई; कर्णकर्कश आवाज कमी होणार?

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम
4

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

Mar 06, 2026 | 05:30 AM
सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

Mar 06, 2026 | 05:30 AM
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.