Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dipti Ketkar : “मला अनुप्रियाचा अभिमान वाटतो कारण…”; ‘मी संसार माझा रेखिते’ मालिका रंजक वळणावर

मी संसार माझा रेखिते मध्ये अनुप्रियाचं रेडिओ जॉकी होण्याचं स्वप्न लग्नानंतर अपूर्ण राहतं. आता ती धाडस करून पुन्हा तिच्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 16, 2026 | 10:51 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रोमोमध्ये ती रेडिओ स्टेशनवर जाऊन श्रोत्यांशी संवाद साधताना दिसते, पण अविनाश यावर नाराज होतो.
  • अभिनेत्री दीप्ती केतकर म्हणते की, लग्नानंतर स्त्रियांची स्वप्नं मागे पडतात, पण अनुप्रिया पुन्हा उभी राहते.
  • या कथेतून स्त्रियांनी स्वतःची स्वप्नं पूर्ण करावीत आणि कुटुंबाने त्यांना साथ द्यावी, असा संदेश दिला आहे.
‘मी संसार माझा रेखिते’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, एका स्त्रीची संसार आणि स्वप्नांमधील कसरत प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. या मालिकेत अनुप्रियाचं रेडिओ जॉकी होण्याचं स्वप्न लग्नानंतर अपूर्ण राहिलेलं दिसतं. संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकूनही तिच्या मनातील हे स्वप्न मात्र कायम जिवंत राहिलं आहे. आता मात्र अनुप्रिया धाडस दाखवत पुन्हा एकदा तिच्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकताना दिसणार आहे.

Deool Band 2 Marathi Movie : ‘देऊळ बंद २’ च्या पोस्टरने जिंकली प्रेक्षकांची मने, चित्रपट खेचणार तुफान गर्दी

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अनुप्रिया पहिल्यांदाच रेडिओ स्टेशनमध्ये पोहोचते आणि तिला श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते. या संवादातून ती तिचा प्रवास आणि अनुभव मांडताना दिसते. मात्र, तिने घरच्यांना न सांगता हा निर्णय घेतल्यामुळे अविनाशला याचा राग येतो. त्यामुळे पुढे अनुप्रियाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार, अविनाश तिच्यावर कशी प्रतिक्रिया देणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा विशेष भाग १७ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजता सन मराठीवर प्रसारित होणार आहे.

मालिकेत अनुप्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकर हिने या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, प्रत्येकजण आयुष्यात काही ना काही स्वप्न पाहत असतो. मात्र, अनेक वेळा विशेषतः लग्नानंतर स्त्रियांची स्वप्नं मागे पडतात. अनुप्रियाची कथा देखील अशीच आहे. रेडिओ जॉकी होण्याचं तिचं स्वप्न संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे अपूर्ण राहिलं, पण तिच्या मुलीच्या प्रेरणेने ती पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे. रेडिओ स्टेशनमधील अनुभव तिच्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरल्याचंही तिने सांगितले.

दीप्ती पुढे म्हणाली की, आजही अनेक महिला अनुप्रियासारखंच आयुष्य जगत आहेत. त्यामुळे स्त्रीचं आयुष्य केवळ घरापुरतं मर्यादित नसून तिची स्वतःची स्वप्नंही असतात, हा महत्त्वाचा संदेश या भागातून दिला जाणार आहे. “दीप्ती केतकर म्हणून मला अनुप्रियाचा अभिमान वाटतो, कारण ती आता स्वतःसाठी जगायला शिकते आहे,” असेही ती म्हणाली.

Rakhi Sawant : एक नाही, दोन नाही… तब्बल दहा लाखांचा ड्रेस! Bigg Boss Marathi 6 Finale साठी राखीची जय्यत तयारी

तिने स्वतःच्या करिअरबाबत सांगताना नमूद केले की, तिला सुरुवातीला कोरिओग्राफीमध्ये करिअर करायचं होतं, मात्र नकळत ती अभिनय क्षेत्राकडे वळली. लहान वयातच कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव तिला थोडा भीतीदायक वाटला होता. मात्र, आज ती आपल्या कामात समाधान शोधते. स्वतःशीच स्पर्धा करत अधिक चांगलं काम करण्याचा तिचा प्रयत्न असतो. शेवटी, प्रत्येकाने आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि नवऱ्याने पत्नीला तिच्या स्वप्नांसाठी साथ द्यावी, हा संदेश तिने प्रेक्षकांना दिला.

Web Title: The series mi sansar majha rekhite is at an intriguing juncture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 10:51 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.