Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arbaz Shaikh : मुंढेंनी सैराट फेम सल्याची हाक ऐकली! अभिनेत्याने रडत शेअर केला व्हिडीओ, FDA ने रुग्णालयात टाकली धाड अन्…

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखने वडिलांच्या उपचारादरम्यान रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती केल्याचा दावा त्याने केला. या प्रकरणाची दखल घेत FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने नोबेल हॉस्पिटलवर धाड टाकली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 09, 2026 | 06:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अरबाज या पोस्टमध्ये रडताना दिसत आहे, त्याच्या वेदना त्याच्या डोळ्यातून वाहताना दिसत आहेत.
  • संबंधित मेडिकलमधील औषध विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
  • “कोणत्याही प्रकारची सक्ती आम्ही केली नाही.”
आज सकाळपासून संपूर्ण सोशल मीडियावर मराठी अभिनेता अरबाज शेखचे नाव आहे. सैराट फेम अरबाजने त्याच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून चाहत्यांना विनंती केली आहे. त्याच्या वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांना सोलापुरातील एका रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पण त्या रुग्णालयातून एका ठराविक मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याने अरबाजला आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात त्याने पोस्ट केली आणि चाहत्यांकडून मदतीची मागणी केली आहे. अरबाज या पोस्टमध्ये रडताना दिसत आहे, त्याच्या वेदना त्याच्या डोळ्यातून वाहताना दिसत आहेत.

Frame Movie Review: ‘घटना चांगली असो किंवा वाईट…फोटो चांगलाच आला पाहिजे’; पत्रकारितेच्या नैतिकतेवर भाष्य करणारा ‘फ्रेम’ कसा आहे?

या संपूर्ण प्रकाराची नोंद घेत FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट त्या रुग्णालयात धाड टाकली आहे. सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलवर ही धाड टाकण्यात आली आहे. तसेच अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार हे रुग्णालय रुग्णालयांतर्गत असणाऱ्या मेडिकलमधूनच औषध खरेदीची सक्ती करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. FDA च्या तपासानुसार हॉस्पिटलमधील फातिमा फार्मसीमध्ये गंभीर त्रुटीही आढळल्या आहेत. यानंतर संबंधित मेडिकलमधील औषध विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

काय म्हणाला होता अभिनेता अरबाज शेख?

अरबाज शेखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. वडील गंभीर आजारी आहेत, अशामध्ये रुग्णालयाच्या मनमानी कारभाराचा त्याच्यावर झालेला परिणाम त्याच्या डोळ्यातून वाहत आहे. अभिनेता सांगतो की, “माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज आणि त्यानंतर हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला 10 हजार रुपये डिपॉजिट भरण्यास सांगण्यात आले. मग उपचारासाठी औषधांची यादी देण्यात आली. ‘औषधे बाहेरून आणू शकतो का?’ हे विचारले असता ‘औषधे रुग्णालयातील मेडिकल मधूनच खरेदी करावे लागतील.’ असे सांगण्यात आले. त्या औषधांसाठी 40 हजारांहून जास्त खर्च आला. मुळात, बाहेरच्या मेडिकलमध्ये मला निम्म्याहून कमी खर्च आला असता.”

Bhumi Pednekar : देशात काही घडलं तर कलाकार राहतात शांत? अभिनेत्रीने सांगितले सत्य, म्हणाली ‘मी तशातली नाही’

डॉक्टरांचे म्हणणे आहे की…

माध्यमांशी संवाद साधताना नोबेल रुग्णालयातील डॉक्टरांनी अरबाजच्या तक्रारी फेटाळल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की “अरबाजच्या वडिलांची प्रकृती गंभीर होती. आम्ही गरजेच्याच औषधांची यादी अरबाजला दिली होती. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती आम्ही केली नाही.”

Web Title: Tukaram mundhe and the fda raided noble hospital in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 06:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.