Ujjwal Nikam on Lalit Prabhakar: : (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ललितने कसाब इतका खरा वाटेल असा केला आहे की बघणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. पण या भूमिकेबद्दल खुद्द उज्ज्वल निकम यांना काय वाटले? त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आणि त्यांचे ते बोलणे सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. Ujjwal Nikam on Lalit Prabhakar:
उज्ज्वल निकम सरांनी स्पष्ट सांगितले. ते म्हणाले, “सॉरी, पण मी ललित प्रभाकरला आधी ओळखत नव्हतो. मी त्याचे आधीचे काम पाहिले नव्हते.” पण जेव्हा त्यांनी त्याला कसाबच्या रूपात पाहिले तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “माझ्याइतके कसाबला जवळून कोणीच पाहिले नाही. मी त्याला रोज कोर्टात बघायचो. त्याची चाल, त्याचे बोलणे, त्याचे हसणे मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे ललितने कसाब कसा केला आहे हे मी लगेच ओळखले. त्याने अगदी हुबेहूब काम केले आहे.”
निकम सरांनी ललितच्या एका खास गोष्टीचे कौतुक केले. ते म्हणाले, “बऱ्याचदा मराठी मुलांना हिंदी बोलताना अडचण येते. पण ललितने कसाबचा तो गंभीर आवाज, त्याची ती बेरकी नजर, ती क्रूरता सगळं अगदी तसंच्या तसं उभं केलं आहे. त्याचे हसणे तर अगदी कसाबसारखेच वाटते.”
Sai Tamhankar and Lalit Prabhakar: सई-ललितची जोडी पुन्हा जमणार …
पुढे ते एक किस्सा सांगताना म्हणाले, “तो आमच्याच भागातला आहे. मी जळगावचा आणि तो धुळ्याचा, खान्देशचा पोरगा आहे. त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे. मी त्याच्या तोंडावर उगाच कौतुक करत नाही, जे खरे आहे तेच सांगतोय.”सिनेमातला एक सीन सांगताना निकम सर भावूक झाले.
ते म्हणाले, “सिनेमात एक सीन आहे जिथे तो एका लहान मुलीवर आणि तिच्या आईवर गोळी झाडतो. तो सीन पाहताना मला खरंच वाटले की उठून जावे आणि ललितच्या थोबाडीत मारावी. इतका राग आला. आणि हेच त्याच्या कामाचे खरे सर्टिफिकेट आहे.” ते पुढे म्हणाले, “ज्या कलाकाराचा अभिनय पाहून तुम्हाला त्याचा राग येतो, संताप येतो, समजा त्याने आपले काम 100 टक्के केले आहे.”
View this post on Instagram
ललित प्रभाकरने याआधी जुगाड, मिडियम स्पायसी असे सिनेमे केले, पण कसाबसारखी निगेटिव्ह भूमिका त्याने पहिल्यांदाच केली आहे. या भूमिकेसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याचे व्हिडिओ पाहिले, बोलण्याची पद्धत शिकली.
प्रहार सिनेमामुळे ललित आता फक्त मराठीत नाही तर हिंदीत पण चर्चेत आला आहे. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने त्याचे कौतुक करणे ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 26/11 चा तो काळा दिवस आपण विसरू शकत नाही आणि हा सिनेमा त्या जखमा पुन्हा ताज्या करतो, असे अनेक प्रेक्षक म्हणत आहेत.
Ans: ललित प्रभाकरने अजमल कसाबची भूमिका साकारली आहे.
Ans: अभिनेता राजकुमार राव यांनी उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे.
Ans: कसाबची देहबोली, बोलण्याची शैली आणि हावभाव प्रभावीपणे साकारल्यामुळे त्यांनी ललितच्या अभिनयाचे कौतुक केले.






