धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अवस्थेमुळे प्रश्न निर्माण केले जात आहेत. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या रुग्णालयामध्ये सेवा, सुविधा आणि स्वच्छता नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सरकारने नवीन कारागृह बांधण्याची व विद्यमान कारागृह वाढवण्याचे सुरुवात केली आहे. अहवालानुसार ९ नवीन कारागृह प्रस्तावित असून त्यांच्याद्वारे १४,६०८ अधिक बंदीवान ठेवण्याची क्षमता निर्माण होणार आहे.
Railway Checking: महानगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा एक मेसेज आला. या पार्श्वभूमीवर भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांचा कडा पहारा आहे. महानगरी -एक्स्प्रेसची या दोन्ही स्थानकांवर कसून तपासणी करण्यात आली.
देशामध्ये आता लवकर डिजीटल जनगणना केली जाणार आहे आणि पूर्वचाचणीसाठी सध्या त्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पूर्वचाचणीसाठी चोपडा तालुक्यातील सध्या २६ गावं घेण्यात आली आहेत.
अशोक पाटील यांचे कुटुंब प्राधान्य कुटुंब योजनेत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत मात्र या कुटुंबातील अशोक पाटील यांचा मुलगा २०१७ पासून मुंबई उच्च न्यायालयात नोकरीला असताना देखील लाभ घेत…
जळगावमध्ये ५० टक्के महिलांचा आरक्षणामुळे दिग्गजांना फटका बसला आहे. उमेदवारही गुडघ्याला बाशिंग बांधून असले तरी युतीबाबत संभ्रम कायम असल्याने नेत्यांचीही अडचण झाली आहे.
दीपोत्सवाच्या १० दिवसांचा काळ एसटी महामंडळासाठी बंपर कमाईचा काळ ठरला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एसटीच्या चौघा आगारांना अक्षरशः सोन्याची पर्वणी लाभली आहे.
अडीच कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला तालुक्यातील देवळी ते भोरस या चार किलो मीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे प्रशासनावर नाराजी व्यक्त झाली.
जळगाव महापालिकेतर्फे प्रभाग रचनेची प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावरील हरकती व सूचना मागणविण्यात येणार आहेत, त्याबाबतचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.
अमळनेर बसस्थानकावर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. ऑनलाईन बुकिंग करुन देखील प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली असून यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र)(पेसा) मध्ये १ हजार ७३४ आदिवासी बहुल गावांचा नव्याने समावेश करण्याबाबत केंद्र सरकारकडे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश पवारांनी दिले.
रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या प्रकरणी तब्बल तीन वर्षांनंतर मध्यरात्री अटक करण्यात आली. देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील कारवाईबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
आपण महायुतीमध्ये लढणार आहोत; मात्र काही ठिकाणी अडचण आल्यास स्वबळावरही लढू. शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकही नगरपालिका मिळता कामा नये,” असे आवाहन केले.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात फिल्मी स्टाईल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. नूराणी नगर भागात चोरट्यांनी फिल्मी पद्धतीने दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे.
दारूच्या नशेत संतापलेल्या पतीने पत्नीवर आधी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेनंतर अपराधी भावनेतून त्याने स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.