Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पॉर्न पाहिल्याने वाढते ग्लोबल वॉर्मिंग?’ हे काय बोलून गेला अभिनव! Rubina Dilaik च्या पतीची ‘ती’ स्टेटमेंट चर्चेत

'The4POV' या पॉडकास्टच्या नव्या भागात अभिनव शुक्लाने केलेल्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. हवामान बदलाच्या विषयावर बोलताना त्याने पॉर्नोग्राफी उद्योगाचाही ग्लोबल वॉर्मिंगमध्ये काही प्रमाणात वाटा असल्याचा दावा केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 19, 2026 | 06:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या उद्योगाचा कार्बन फूटप्रिंटही लक्षणीय असू शकतो, असे त्याने स्पष्ट केले.
  • विशेषतः पुरुषांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, असेही त्याने सांगितले.
  • आता अभिनवच्या नव्या वक्तव्यामुळे हा पॉडकास्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अभिनेत्री रुबीना दिलैक, हिना खान आणि त्यांचे पती अभिनव शुक्ला व रॉकी जयसवाल यांनी सुरू केलेल्या ‘The4POV’ या पॉडकास्टमध्ये अलीकडेच हवामान बदल आणि समाजाशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या क्लायमेट चेंजविषयक विधानाचा संदर्भ घेत असताना अभिनव शुक्लाने केलेल्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अभिनवने म्हटले की, “ग्लोबल वॉर्मिंगच्या कारणांपैकी पॉर्नोग्राफी उद्योगाचाही काही प्रमाणात वाटा आहे.” त्याच्या मते, पॉर्न तयार करणे, ते सर्व्हरवर संग्रहित करणे आणि जगभर स्ट्रीमिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे या उद्योगाचा कार्बन फूटप्रिंटही लक्षणीय असू शकतो, असे त्याने स्पष्ट केले.

‘स्वतःला शक्य तितकं शुद्ध ठेवलं’, सीतेची भूमिका साकारण्यासाठी साई पल्लवीने केली ‘ही’ तयारी; स्वतःच सांगितला प्रवास

याचबरोबर त्याने पॉर्नोग्राफीचे मानसिक आणि सामाजिक परिणामही मांडले. त्याच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या सामग्रीमुळे वास्तव जीवनाबाबत अवास्तव अपेक्षा निर्माण होतात, वेळ वाया जातो आणि व्यक्ती आपल्या उद्दिष्टांपासून दूर जाऊ शकते. विशेषतः पुरुषांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, असेही त्याने सांगितले.

अभिनवचे हे विधान ऐकून रुबीना दिलैक आश्चर्यचकित झाली आणि नंतर हसू लागली. हिना खान आणि रॉकी जयसवाल यांनीही हलक्याफुलक्या अंदाजात प्रतिक्रिया दिली. मात्र या चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींना अभिनवने मांडलेला मुद्दा विचार करण्यासारखा वाटला, तर अनेकांनी त्याच्या दाव्यावर टीका केली.

Kuch zyada hi dark hogaya 🌚 #HinaKhan #RubinaDilaik #AbhinavShukla pic.twitter.com/Gsi8LGri25 — Hina_khanfc (@Hinakhanfc24) July 18, 2026

Marathi Actress and Business : फक्त अभिनय नव्हे तर व्यवसायातही अव्वल! ‘या’ मराठी अभिनेत्री आहेत बिझनेसवूमन

दरम्यान, ‘The4POV’ पॉडकास्ट यापूर्वीही वादात सापडला होता. एका भागात रुबीनाने अभिनेता गौरव खन्ना यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत केलेल्या कथित टिप्पणीचा उल्लेख केला होता. त्या प्रकरणानंतर झालेल्या चर्चेनंतर आता अभिनवच्या नव्या वक्तव्यामुळे हा पॉडकास्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Web Title: Watching porn increases global warming the4pov podcast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • porn industry

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.