
फोटो सौजन्य - Social Media
मुलाखतीदरम्यान प्रिया म्हणते, “उमेशला महागडं घड्याळ, भारीतलं Perfume तसेच Wallet अशा गोष्टींची आवड नाही. तो स्वतःहून या गोष्टी कधी खरेदीही करत नाही. त्याला मी या गोष्टी भेट म्हणून देत असते आणि मला या गोष्टींची प्रचंड आवड आहे.” पुढे प्रिया म्हणते की, “उमेशला मला गजरा देणे किंवा चाफा देणे आवडतं. मलासुद्धा त्याच्या या गोष्टी आवडतात. मला त्याने स्वतः स्वतःच्या हाताने लिहलेलं पत्र फार आवडतात.” एकंदरीत, प्रियाला जरी महागडं घड्याळ, भारीतलं Perfume तसेच Wallet यांची आवड असली तरी तिला उमेशने दिलेली साधी भेटच जास्त भावते.
उमेश-प्रियाच्या नात्यातला हा साधेपणाचा त्यांना आदर्श जोडी बनवतो. या मुलाखतीतून एक गोष्ट मात्र समोर आली ती म्हणजे “उमेशचा साधा स्वभाव आणि त्याची साधी आवड!” या जोडीच्या साधेपणातच प्रचंड प्रेम दडलंय. प्रियाला Fancy गोष्टींची आवड आहे, ती त्या गोष्टी भेट म्हणून उमेशला देत असते, तर उमेशच्या साध्या आवडीनिवडी प्रियाच्या मनाला आवडतात, यालाच तर प्रेम म्हणतात!