फोटो सौजन्य - Social Media
प्रिया-उमेश या जोडीने नवराष्ट्र वाहिनेवर मुलखात दिली आहे. त्यांची ही मुलाखत सध्या चर्चेत असल्याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या नात्यासंबंधित काही महत्वाचे पैलू सांगितले आहेत. एखादं नातं जेव्हा वर्षोनुवर्षे विणलं जातं तेव्हा त्या नात्यात अनेक बदल होतात. हे बदल का होतात? याचं छानसं उत्तर प्रिया-उमेशने या मुलाखतीत दिले आहे. अनेकदा एका नात्यात अडकलेले दोन जीव कधी ना कधी एकमेकांना एक प्रश्न नक्कीच करतात “तू आधीसारखा माझ्यावर प्रेम नाही करत? आधीसारखा माझ्याशी वागत नाहीस?” मुळात, हा प्रश्न आपल्या आदर्श जोडीला (प्रिया-उमेश)ही पडला होता, पण त्यांना हा प्रश्न समजूतदारपणाने हाताळता येतो.
याविषयी सांगताना प्रिया म्हणते की, “मला माहितीये की मी जशी माझ्या विशीत होते तशी आता नाहीये. आता मी Mature झालीये, जरा शांतही झालीये. तरी सुद्धा Core Energy सारखीच आहे. तसेच काही उमेशच्या बाबतीतही आहे. तो ज्या गोष्टी आधी करायचा ते आता करत नाही आणि ज्या गोष्टी आता करतो त्या आधी करत नव्हता. पण त्याच्यातही Core Energy सारखीच आहे.” हे सांगताना प्रिया म्हणते की त्यांच्यातही अशी चर्चा अनेकदा झालीये की “तू पूर्वी जसा माझ्याशी लाडाने बोलायचास ते आता करत नाहीस.” तेव्हा प्रिया उमेशने दिलेले गमतीशीर उत्तर सांगते की उमेश म्हणायचा “तेव्हा तू पटण्याच्या स्टेजमध्ये होतीस पण आता तू पटून झाली आहेस.”
एकंदरीत, नाते हे बदलते असते. नात्यात काही गोष्टी बदलत असतात, या बदलला वय, परिस्थिती तसेच अनेक गोष्टी कारणीभूत असतात. पण नात्यात गोष्टी बदलल्या म्हणजे प्रेम कमी झालंय, प्रत्येकवेळी हेच एक कारण नसते.






