Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया कर्करोग व्यवस्थापन: डॉक्‍टरांसोबत खुल्‍या मनाने संवाद साधणे महत्त्वाचे

डॉ. समीर तुळपुळे (कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथील सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट हेमॅटोलॉजिस्‍ट) यांनी क्रोनिक मायलॉइड ल्‍युकेमिया या कर्करोगाच्या व्यवस्थापनाबद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 18, 2024 | 05:31 PM
फोटो सौजन्य-iStock

फोटो सौजन्य-iStock

Follow Us
Close
Follow Us:

क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया (सीएमएल) हा एक असा कर्करोग आहे, जो बोन मॅरोमधील रक्त तयार करणाऱ्या पेशींमध्ये सुरू होतो आणि रक्तात पसरू शकतो. योग्य ते प्रश्न विचारल्याने तुमच्यावरील उपचार प्रभावी आणि तुमच्या गरजांनुरूप आहेत याची खात्री करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

डॉ. समीर तुळपुळे (कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथील सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट हेमॅटोलॉजिस्‍ट) म्‍हणाले, ”माझ्या डॉक्‍टरी सरावामध्‍ये मला निदर्शनास आले आहे की, क्रोनिक मायलॉइड ल्‍युकेमिया (सीएमएल)चे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी नियमितपणे डॉक्‍टरांकडून तपासणी करण्‍याची गरज आहे. रूग्‍णांनी त्‍यांच्‍या बीसीआर-एबीएल पातळ्यांवर देखरेख ठेवणे महत्त्वाचे आहे, यामुळे आम्‍हाला रूग्‍णांच्‍या उपचार प्रतिसादावर देखरेख ठेवण्‍यास आणि गरज असलयास वेळेवर बदल करण्‍यास मदत होते. रूग्‍णांनी डॉक्‍टरांसोबत खुल्‍या मनाने संवाद साधणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. यामुळे कोणत्‍याही आवश्‍यक बदलांचे त्‍वरित निराकरण होण्‍याची, सीएमएलच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनाला साह्य मिळण्‍याची आणि संपूर्ण उपचार प्रवासादरम्‍यान जीवनाचा दर्जा कायम राहण्‍याची खात्री मिळेल.”

१. नियमित मॉनिटरिंगद्वारे प्रगतीवर लक्ष कसे ठेवायचे?
सीएमएलच्या व्यवस्थापनासाठी नियमित बीसीआर- एबीएल तपासणी महत्त्वाची ठरते. या चाचण्या बीसीआर-एबीएल प्रोटीन पातळ्या तपासतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या उपचारांची प्रगती तपासता येते. युरोपियन ल्युकेमियानेट (ईएलएन) मार्गदर्शक तत्त्वांनुसार विशिष्ट बीसीआर- एबीएल टप्पे गाठल्यामुळे तुमचे उपचार प्रभावी आहेत की नाही हे दिसून येते.

२. माझ्या सध्याच्या उपचारांमध्ये संभाव्य प्रतिरोध किंवा असहनशीलतेबाबत मला काय माहीत असणे गरजेचे आहे?
टायरोसीन किनेस इनहिबिटर्स (टीकेआयएस) हा सीएमएल उपचारांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु कधी-कधी रूग्णांना त्यांच्याबाबत प्रतिरोध किंवा असहनशीलता होऊ शकते. सातत्याने मळमळ होणे, स्नायूदुखी किंवा प्रचंड थकवा ही लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे वेगळे उपचार करण्याची गरज दिसू शकते.

३. सीएमएल उपचारांमधील नवीन सुधारणा काय आहेत?
सीएमएल उपचार सध्या बदलत आहेत. नवनवीन उपचार पद्धती सुधारित सुरक्षा आणि उपयुक्तता दर्शवतात. हे उपचार चांगले परिणाम दर्शवू शकतात, विशेषतः ज्यांचा रोग पुढच्या टप्प्यात गेलेला आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरतात. या पर्यायांची तुमच्या डॉक्टरांसोबत चर्चा करा.

४. माझ्या सीएमएलचे संपूर्ण कालावधीत योग्यरित्या व्यवस्थापन केले आहे हे मला कसे कळेल?
सीएमएलचे व्यवस्थापन ही एक बदलती प्रक्रिया आहे. तिला नियमित मॉनिटरिंग आणि अ‍ॅडजस्टमेंट्सची गरज पडते. प्रभावी व्यवस्थापनात फक्त उपचारांचे पालनच नाही तर वेळोवेळी पाठपुरावा अपॉइंटमेंट्सच्या तसेच चाचण्यांच्या वेळा ठरवून तुमच्या रोगांवर तसेच उपचारांना प्रतिसादांवर लक्ष ठेवणे या गोष्टींचा समावेश आहे.

Web Title: Chronic myeloid leukaemia cancer management it is important to have an open conversation with your doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 05:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.