Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्करोगाविरुद्ध ‘लढा’; जनजागृती आणि आधुनिक उपचारांमुळे रुग्ण होताहेत ‘फायटर’!

World Cancer Day 2026 : कर्करोग हा ‘मृत्यूचा शिक्का’ न राहता ‘लढण्याची संधी’ ठरत आहे. योग्य वेळी तपासणी, योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर कर्करोगावर मात करणे शक्य आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 05, 2026 | 12:54 PM
World Cancer Day 2026

World Cancer Day 2026

Follow Us
Close
Follow Us:

विजय गिरमे, पिंपरी : धावपळीची जीवनशैली, वाढते प्रदूषण, बदललेला आहार आणि ताणतणाव यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र, बदलत्या काळात ‘कॅन्सर म्हणजे कॅन्सल’ ही भीती मागे टाकत शहरातील अनेक रुग्ण प्रबळ इच्छाशक्ती, कुटुंबाचा आधार आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या जोरावर या आजाराशी लढत आहेत. उद्या (४ फेब्रुवारी) जागतिक कर्करोग दिनानिमित्त शहरात कर्करोगाविरोधातील लढ्याचे वास्तव, संधी आणि आव्हाने पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहेत.

औद्योगिक पट्ट्यात ‘हे’ कर्करोग अधिक

  • औद्योगिक क्षेत्र, प्रदूषण आणि तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते सेवन यामुळे शहरात काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग अधिक प्रमाणात आढळत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
  • पुरुषांमध्ये : मुखाचा कर्करोग (तंबाखू, गुटखा, पानमसाला सेवन) फुफ्फुसाचा कर्करोग
  • महिलांमध्ये : स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा (सर्व्हायकल) कर्करोग
  • लवकर निदान : जीवनदानाची गुरुकिल्ली
शहरातील कर्करोग तज्ज्ञांच्या मते, पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यास उपचारांचा यशाचा दर ९० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र, आजही अनेक रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याने उपचार अधिक गुंतागुंतीचे आणि खर्चिक ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच विविध खासगी संस्थांमार्फत आता कमी दरात स्क्रीनिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरीही जनजागृतीअभावी अनेक नागरिक नियमित तपासणी टाळत असल्याचे वास्तव आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या मते,  “कर्करोग हा केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक लढा आहे. कुटुंबाचा आधार आणि सकारात्मक विचार उपचारात औषधांइतकेच महत्त्वाचे असतात. शहरात आता जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांनी घाबरून न जाता वेळेत तपासणी आणि उपचार घ्यावेत. थेरगाव येथे आपण पुढच्या दोन वर्षांत फक्त कर्करोगाचा रुग्णालय उभारणार आहोत.

बदलती जीवनशैली आणि वाढता धोका

आयटी पार्क, कंपन्या आणि शिफ्ट ड्युटीमुळे तरुणाईमध्ये अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि झोपेची कमतरता वाढत आहे. यामुळे कर्करोगासह इतर जीवनशैलीजन्य आजारांचा धोका वाढत आहे.

कर्गरोगची लक्षणे

  • शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणे.
  • भूक मंदावणे व अचानक वजन कमी होणे.
  • दीर्घकाळ टिकणारा खोकला किंवा आवाजात बदल.
  • भरी न होणारी जखम.
  • महिलांमध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त किंवा रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव

कर्गरोग झाल्यास काय काळजी घ्यावी

  • दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम आणि सकस आहार
  • तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि मद्यपानापासून कायमची मुक्ती
  • वयाच्या चाळीशीनंतर वर्षातून एकदा तरी संपूर्ण आरोग्य तपासणी

पिंपरी-चिंचवडमध्ये कर्करोग रुग्णालयाची गरज का?

शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांत कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे. खासगी रुग्णालयांमधील उपचार खर्च सर्वसामान्य रुग्णांसाठी अवाक्याबाहेर आहे. महापालिकेच्या एकाही रुग्णालयात सध्या पूर्ण क्षमतेची कर्करोग उपचार सुविधा उपलब्ध नाही. जिल्हा रुग्णालयातील सुविधा तुटपुंज्या ठरत आहेत. सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात सप्टेंबर २०२४ पासून कर्करोग रुग्णांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र, येथे केवळ ५ खाटांचीच सोय असल्याने पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या वाढत्या रुग्णसंख्येसाठी ही व्यवस्था अपुरी पडत आहे. चाचण्या बहुतेक वेळा खासगी किंवा इतर सरकारी रुग्णालयांमध्ये करून त्यानंतर उपचारासाठी रुग्णांना येथे यावे लागत आहे.

‘लढा’ अजूनही अपूर्ण

जागतिक कर्करोग दिनानिमित्त शहरात जनजागृती वाढत असली, तरी पिंपरी-चिंचवडसारख्या मोठ्या औद्योगिक शहरात स्वतंत्र आणि सुसज्ज कर्करोग रुग्णालयाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. लवकर निदान, परवडणारे उपचार आणि मानसिक आधार या तीन स्तंभांवरच कर्करोगाविरुद्धचा खरा लढा यशस्वी होऊ शकतो. आज कर्करोग हा ‘मृत्यूचा शिक्का’ न राहता ‘लढण्याची संधी’ ठरत आहे. योग्य वेळी तपासणी, योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर कर्करोगावर मात करणे शक्य आहे—हा संदेश पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या ‘फायटर’ रुग्णांची कहाणी देत आहे.

Web Title: Fighting against cancer awareness campaigns and modern treatments turning patients into fighters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • cancer day
  • world cancer day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.