फोटो सौजन्य - Social Media
आजकाल लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता फार वाढली आहे. तरुणांची बहुतेक संख्या नियमितपणे व्यायामशाळेत जाते. दररोज व्यायाम करणे अतिशय चांगली गोष्ट आहे. तरुणांमध्ये आरोग्यासंबंधित असलेली ही जागरूकता खरचं कौतुकास्पद आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? नेहमी फिटनेसचा विचारात असलेल्या लोकांमध्ये हृद्यविकाराचे झटके येण्याचे प्रमाण इतरांहून जास्त असते. आपण अनेकदा असे पाहिले असेल कि व्यायामशाळेत व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुण जागीच ठार! अशा अनेक बातम्या दर महिन्यात येत असतात. पण याचे अर्थ असे नाही कि व्यायाम करणे चुकीचे आहे. व्यायाम करणे तेव्हाच योग्य असते जेव्हा व्यायाम करण्याची पद्धत योग्य असते. चुकीचे व्यायाम केल्याने झटका येणे साहजिक आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, आजची तरुणाई फिटनेसमागे वेडी आहे. शरीर बनवण्यासाठी रक्ताचं पाणी होईपर्यंत व्यायामशाळेत घाम गाळतात. परंतु, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. मर्यादेबाहेर व्यायाम केले तर त्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. कधी कधी घाईत तरुण चुकीच्या पद्धतीने व्यायाम करतात. जर व्यायामाची पद्धत माहिती नसेल तर कधीही कुणाच्या नियंत्रणात व्यायाम केलेले उत्तम असते. अति व्यायाम तसेच चुकीच्या व्यायामाने हार्ट अटॅक येण्याची मोठी शक्यता असते, त्यामुळे व्यायामशाळा निवडण्यागोदर तेथील ट्रेनरला पारखून घ्या मगच व्यायामशाळेची निवड करा.
आरोग्यासाठी फिकर असणारे व्यक्तिमत्व कधी कधी त्या धुंदीत इतर गोष्टींसाठी बेफिकिर होतात. प्रोटीन आणि सप्लिमेंट्सवर इतके आधारित राहतात कि इतर गरजेच्या घटकांना विसरून जातात. त्या पोषक घटकांच्या अभावी हृदय कमकुवत होतो आणि झटका येण्याची शक्यता वाढते. तसेच जीवनशैलीतील अनेक घटक हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत असतात. मेंदूला होणारा मानसिक त्रासाचे रूपांतर हळू हळू शारीरिक त्रासात होते, त्यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि हृदयाच्या झटक्यासारखी संभाव्य स्थिती निर्माण होते. याला उपचार एकच कि टेन्शनपासून स्वतःला लांब ठेवा. दररोज चांगली झोप घ्या.