फक्त 5 रुपयांत तयार करा हे आयुर्वेदिक पाणी, झटपट वितळेल चरबी, वेट-लॉससाठी फायदेशीर
आजकाल लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. लोक घरातील अन्न खाण्याऐवजी बाहेरील तेलकट खाद्यपदार्थांचे अधिक सेवन करतात, ज्यामुळे फार कमी काळात ते लठ्ठपणाच्या समस्येला बळी पडतात. आता हे वजन वाढते तर फार लवकर मात्र एकदा वाढले की, सहसासहजी कमी होत नाही. लठ्ठपणाची ही समस्या अनेकांना भेडसाळत आहे. यामुळे आपल्याला आपल्या आवडीचे कपडे घातला येत नाहीत तसेच आपल्या सौंदर्यात देखील हे बाधा आणत असत. बऱ्याचदा वेगवेगळ्या डाएट्स, व्यायाम, आणि महागडी औषधे वापरूनही म्हणावे तसे चांगले परिणाम दिसत नाहीत.
तुम्ही वेट लॉसचा विचार केला असेल आणि काही केल्या हे वाढलेले वजन कमी होत नसेल तर आज आम्ही तुम्हाला यावर एक रामबाण उपाय सांगणार आहोत. या उपायाने अवघ्या काही दिवसांतच तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला विशेष काहीही करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त आपल्या दिनचर्येत बडीशेपच्या पाण्याचा समावेश करायचा आहे. हे पाणी वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी लाभदायक ठरत असते.
हेदेखील वाचा – सावधान! हे पदार्थ पुन्हा गरम केल्यानंतर बनतात विष, आजपासूनच सेवन टाळा नाहीतर पडेल महागात
बडीशेपचे पाणी कसे तयार करावे?
यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा बडीशेप एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी या पाण्याचे सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे पाणी उकळून देखील घेऊ शकता. कोमट पाण्यात याचे सेवन करत असाल तर यात किंबचा रस टाकून प्यायल्याने आरोग्याला खूप फायदे मिळू शकतात. तसेच फक्त सकाळीच नाही तर जेवणांनंतरही या पाण्याचे सेवन केले जाऊ शकते. यामुळे पचनक्रिया सुधारेल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.
भूक कमी करते
वजन कमी करायचे असल्यास आपल्या भूकेवर नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे असते. अशात हे पाणी भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. बडीशेपमध्ये असणारे फायबर घटक भूक कमी करण्यास उपयुक्त ठरते, ज्यामुळे कमी जेवण केले तरी आपले पोट भरलेले राहते. ज्या लोकांना अधिक अन्न खाण्याची सवय आहे त्यांच्यासाठी हे पाणी अतिशय उपयुक्त आहे.
शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते
बडीशेपचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करते. शरीरातील विषारी पदार्थांमुळे वजन वाढते. यामुळे त्वचा आणि आरोग्य देखील खराब होऊ लागते. बडीशेपचे पाणी रोज पिल्याने शरीर शुद्ध, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते.
हेदेखील वाचा – 30 दिवस सलग हळदीचे सेवन केले तर असे अनोखे बदल दिसून येतील की स्वतःलाही ओळखू शकणार नाही
पचनसंस्था सुधारते
बडीशेपचे पाणी पचनसंस्था सुधारण्यास देखील खूप फायदेशीर आहे. हे पाणी अन्नाचे पचन जलद करते ज्यामुळे चरबी जमा होण्याची शक्यता कमी होते. जेवणानंतर बडीशेपचे पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होतात आणि यामुळे पचनसंस्था कार्यक्षम राहते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.