फोटो सौजन्य - Social Media
फक्त मोठ्यांनाच नव्हे तर लहान मुलांनाही हृदय विकार होण्याच्या संभावना असतात. सध्याच्या काळात लहान किंवा नवजात बाळांमध्ये कॉन्जेनिटल हार्ट डिसीज (CHD) होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. लहान मुलांमध्ये मोठ्या संख्येने या गोष्टी आढळून येत आहेत. एका संशोधनात आढळून आले आहे कि, देशामध्ये प्रत्येक १००० बालकांमागे ८ ते १२ बालकांना हृदयविकाराचा धोका असतो. पालकांनी आपल्याला पाल्याला या सर्व बाबीपासून लांब ठेवण्यासाठी आणि आपल्या पाल्याला निरोगी आरोग्य देण्यासाठी त्यांची नियमित टेस्ट करणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा : कथाकार व.पु. काळे यांचे ‘हे’ साहित्य नक्की वाचा
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांमध्ये हृदयविकार सहसा दिसून येत नाही. यासाठी त्यांची टेस्ट करणे गरजेची असते. प्रार्थमिक टेस्टमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे, उपचारासाठी हालचाल लवकर करता येते. जर हृदयविकार अनुवांशिक असेल तर आपल्या पाल्याची टेस्ट करून घेणे गरजेची आहे. वेळीच उपाय करण्यासाठी आणि भविष्यातील वाईट शक्यता रोकण्यासाठी टेस्ट करणे गरजेचे असते.
हृदयविकार असलेल्या मुलांमध्ये श्वसनाचा त्रास होणे, थकल्यासारखे वाटणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, उलट्या होणे आणि घाम येणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. हृदयविकाराची लक्षणे दिसून येताच, वेळीच निदान होणे आणि उपचार सुरू होणे महत्त्वाचे असते, कारण यामुळे पुढील काळात गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकते. आपल्या परिचयाच्या कोणत्याही व्यक्तीमध्ये अशी लक्षणे आढळल्यास त्यांना टेस्ट करून घेण्याचा सल्ला द्यावा. तसेच त्यांना खालील उपाययोजनांविषयी सांगावे.
हे देखील वाचा : दिवाळीच्या खरेदीसाठी दिल्लीतील ‘या’ बाजारपेठा आहेत सर्वोत्तम; सर्व वस्तू बजेटमध्ये होतील उपलब्ध
मुलांचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय अवलंबणे गरजेचे आहे. मुलांना पोषक आहार द्या, ज्यात फळे, भाज्या, प्रोटीन, आणि जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असतील. आपल्या पाल्याला बाहेरील तेलकट आणि शिळ्या पदार्थापासून लांब ठेवा. मुलांना शारीरिक क्रियाकलापांसाठी प्रोत्साहन द्या, जसे की खेळ, धावणे, पोहणे, इत्यादी. मुलांना तणावापासून दूर ठेवा, त्यांना खेळण्याची आणि आनंदी राहण्याची संधी द्या. त्यांचा स्क्रिनटाईम कमी करा. बाहेरील खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा. हृदयाचे नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे, विशेषतः जर कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल. पालकांनी मुलांचे आरोग्य लक्षात ठेवून नियमित तपासण्या करून घेतल्यास, हृदयविकाराची वेळेवर ओळख होऊन त्यावर योग्य उपाययोजना करता येऊ शकते.