ऑक्टोबर महिना म्हणला की सणासुदीचा हंगाम. भारतात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. सध्या नवरात्र आणि दसरा हे सण साजरे झाले असून सगळ्या गृहिणी घराच्या सफाई करण्यात व्यस्त झाल्या आहेत. कारण आता दिवाळी येत आहे. या काळात, घरे सजवण्यापासून ते स्वत:साठी योग्य पोशाख निवडण्यापर्यंत, लोक अशा बाजारपेठांचा शोध घेतात जिथे बजेटमध्ये सर्वकाही खरेदी करता येईल. आज आम्ही तुम्हाला दिवाळीच्या खरेदीसाठी दिल्लीच्या अशाच काही खास बाजारांपेठांबद्र्दल सांगमार आहोत. या बाजारपेठांमध्ये तुम्ही कमी बजेटमध्येही तुमची सर्व खरेदी करू शकता.चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही बजेटमध्ये दिवाळीची खरेदी कुठे खरेदी करू शकता. ( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दिवाळीच्या खरेदीसाठी दिल्लीतील या बाजारपेठांना नक्की भेट द्या
कमला नगर मार्केट- करवा चौथ किंवा दिवाळीच्या खरेदीसाठी दिल्लीचे कमला नगर मार्केट एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथे तुम्हाला इंडो-वेस्टर्न ड्रेस, देसी आउटफिट्स, ज्वेलरी, आणि मेकअपशी संबंधित वस्तू कमी किमतीत मिळतील. दिवाळीसाठी कपड्यांच्या खरेदीसाठी हा बाजार अतिशय योग्य ठरू शकतो
दिल्ली हाट- सरोजिनी नगरजवळील दिल्ली हाटमध्ये तुम्हाला हस्तकला वस्तूंचा उत्कृष्ट संग्रह मिळेल. दिवाळीसाठी घर सजवण्याच्या वस्तूंसाठी ही बाजारपेठ योग्य ठरेल. सातही दिवस खुले असलेले हे ठिकाण खास सणांच्या काळात अत्यंत आकर्षक बनते
सदर बाजार- सदर बाजार आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे तुम्ही कपडे, भांडी, कॉस्मेटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता. घर सजवण्यासाठी दिवाळी लायटिंग घेण्यासाठीही हा बाजार सर्वोत्तम ठरेल
गांधी नगर मार्केट- गांधी नगर मार्केटमध्ये करवा चौथ आणि दिवाळीसाठी बजेटमध्ये कपडे खरेदी करता येतील. मोलभाव करण्याची संधीही येथे मिळते, ज्यामुळे हा बाजार खरेदीदारांमध्ये विशेष लोकप्रिय आहे
चांदनी चौक- चांदनी चौक मार्केटमध्ये तुम्हाला पारंपारिक भारतीय पोशाख मिळतील. करवा चौथच्या खास खरेदीसाठी हा बाजार योग्य आहे
लाजपत नगर मार्केट- बजेटमध्ये डिझायनर कपडे आणि दागिन्यांचे उत्कृष्ट डिझाईन्स शोधत असाल, तर लाजपत नगर मार्केट तुमच्यासाठी उत्तम ठरेल. या सर्व बाजारपेठा तुमच्या सणासुदीच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करतील