मराठी साहित्यामध्ये आपले बहुमूल्य योगदान देऊन लेखक व.पु.काळे मराठी वाचकांच्या मनात अजरामर झाले आहेत. त्यांच्या एका एका साहित्यावर मराठी वाचकाने भरभरून प्रेम केले आहे. गेल्या कित्येक पिढा त्यांचा हा साहित्याचा वारसा जपत आहे. त्यांच्या कादंबऱ्या गेल्या अनेक दशकांपासून वाचकांच्या मनावर राज्य करत आहेत. जर तुम्हाला मराठी साहित्यांचा अनुभव घ्यायचा आहे तर वपुस्पर्शाने पावन झालेल्या 'या' साहित्यांचे वाचन नक्की करावे.
या मराठी कादंबर्या नक्की वाचा. (फोटो सौजन्य - Social Media)
१९७६ साली 'पार्टनर' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. या साहित्यातील एक वाक्य आणखीन प्रेक्षकांना परिचित आहे ते म्हणजे- 'मुलाचं लग्न झालं तर आई दुरावते आणि त्याला मूल झालं तर बायको दुरावते.' या कादंबरीत एका मध्यमवर्गीय मराठी तरुणाच्या आयुष्यातील चढउतार चित्रित करण्यात आले आहेत.
व.पु. काळे यांनी त्यांच्या 'कर्मचारी' या पुस्तकात स्वतःचे अनुभव सांगितले आहे. ते ही एका काळी कर्मचारी होते. एकंदरीत, नोकरी करणाऱ्याची व्यथा त्यांनी त्यांच्या या कादंबरीत मांडली आहे.
वपुस्पर्श झालेला वपुर्झा ही कादंबरी वाचकांच्या खास पसंतीची आहे. या कादंबरीत एकमेकांशी नाते नसलेले अनेक परिच्छेद आहेत, तरी ते वाचकांना त्यांच्यातील नात्यांचे दर्शन घडवून आणते. अनेक ढंगी परिच्छेदांची सुरेख गुंफण ह्या पुस्तकात गुंफण्यात आली आहे.
बाबी या स्त्रीची स्वतःशी आणि समाजाशी असलेली लढाई 'ही वाट एकटीची' या पुस्तकात मांडण्यात आली आहे. अनेक दशके झालीत तरीही वाचकांना या कादंबरीसाठी असलेले वेड कमी झाले नाही आहे.
स्वतःबरोबर घडलेल्या एका दुर्घटनेतून सावरून जगण्याची नवीन ताकद मिळवून वपुंनी या साहित्याची निर्मिती केली आहे. आपण सारेच अर्जुन आहोत, असा संदेश या पुस्तकातून देण्यात आला आहे.