फोटो सौजन्य - Social Media
नियमित व्यायाम करणे हे कधीही फायद्याचे असते. व्यायाम कोणताहि असूद्यात जर तुम्ही तो योग्य पद्धतीत आणि योग्य वेळेमध्ये कराल तर कधीही त्याचे उत्तम प्रतिसाद आपल्या आरोग्यावर जाणवतील. एकंदरीत, स्वतःला निरोगी आणि फीट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे फार गरजचे असते. वाढत्या वजनाला कंटाळून तसेच बैठी नोकऱ्या करणारी बहुतेक मंडळी सकाळसकाळी चालण्यास जातात. काही मंडळींना जिमला जाण्याची सवय असते. तेथे ते चालण्याऐवजी ट्रेडमिलच्या वापराने चालण्याचा व्यायाम करतात.
हे देखील वाचा : तुम्हाला ग्रीन टी ची चव आवडत नसेल तर या गोष्टी मिसळा
व्यायाम हा निरोगी आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, आणि वजन कमी करण्यासाठी धावणे एक लोकप्रिय पर्याय आहे. मात्र, तुम्हाला ट्रेडमिलवर धावायचे आहे की बाहेर जॉगिंग करायचे याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. या दोन्ही प्रकारच्या व्यायामामध्ये काही वेगळेपण असते आणि आरोग्यावर वेगवेगळे परिणाम होतात.
रस्त्यावरून धावत असताना अनेक गोष्टी असतात ज्यांची आपल्याला चिंता करावी लागते. यामध्ये त्या रस्त्यावरील ट्राफिक तसेच बाहेरील हवामान यांचा समावेश आहे. कधी कधी खराब हवामानमुळे आपले बाहेर धावण्यास जाणे टळते. अशा वेळी ट्रेडमिल फार महत्वाचे ठरते. ट्रेडमिल मध्ये अशा प्रकारची चिंता उदभवत नाही. रस्त्यावर वेगाने धावत असलेल्या गाड्यांमुळे जॉगिंग करणे धोकादायक ठरू शकते, अशावेळी ट्रेडमिल एक सुरक्षित पर्याय ठरतो. ट्रेडमिलवर तुम्ही तुमचा वेग आणि उतार नियंत्रित करू शकता. त्यामुळे विविध प्रकारचे व्यायाम प्रकार (उदाहरणार्थ, इंटेन्सिटी ट्रेनिंग) सहज करता येतात.
बाहेरील अनेक घटकांमुळे आपल्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. पण काही घटक आपल्यासाठी फार महत्वाचे ठरतात. बाहेर जॉगिंग करताना तुम्हाला ताजी हवा, सूर्यप्रकाश आणि निसर्गाचा आनंद घेता येतो, जे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बाहेर धावताना पायांवर अधिक ताण येतो कारण जमिनीची रचना वेगळी असते, यामुळे जास्त कॅलरी खर्च होतात, ज्याचा आरोग्यसाठी आणि शरीरवृष्टीसाठी फार फायदा आहे.
हे देखील वाचा : यंदाच्या नवरात्रीमध्ये ‘या’ नऊ रंगाचे कपडे करा परिधान, वाचा प्रत्येक रंगाचे महत्व
जर तुम्हाला घरात किंवा जिममध्ये सुरक्षित वातावरणात धावायचे असेल, तर ट्रेडमिल हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, तुम्हाला नैसर्गिक वातावरणात व्यायाम करायचा असेल आणि विविधतेसह व्यायामात मनःशांती हवी असेल तर बाहेर जॉगिंग करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
शेवटी, कोणत्याही प्रकारच्या व्यायामाचा फायदा होतो. तुमच्या जीवनशैलीनुसार, तुम्हाला कोणता प्रकार सोयीस्कर वाटतो, त्यानुसार निवड करा आणि तुमच्या फिटनेस ध्येयांच्या दिशेने पावले उचला.