यंदाच्या नवरात्रीमध्ये 'या' नऊ रंगाचे कपडे करा परिधान
हिंदू धर्मात येणाऱ्या सर्वच सणांना विशेष महत्व आहे. भारतासह इतर अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या जाती जमातींचे लोक राहतात. पण सण उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा केले जातात. 3 ऑक्टोबरपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्री हा सण गुजरातमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सुंदर दांडीया आणि रास गरबा खेळत देवीची मनोभावे पूजा केली जाते. तसेच महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन केले जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. तसेच या रंगाचे कपडे परिधान करून अनेक लोक परिधान करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यंदाच्या नवरात्री उत्सवासात कोणत्या दिवशी कोणते रंग परिधान करावे आणि या रंगाचे काय महत्व आहे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
नवरात्री उत्सवात अनेक महिला पुरुष उपवास करतात. देवीची स्थापना झाल्यानंतर नऊ दिवस चप्पल न घातला प्रवास केला जातो. तसेच अनेक लोक नऊ दिवस उपवास करून देवीची मनोभावे पूजा करतात. या दिवसांमध्ये उपवास केल्यास देवी प्रसन्न होऊन चांगला आशीर्वाद देते, असे मानले जाते. नऊ दिवसांच्या उपवासामध्ये फक्त उपवासाच्या पदार्थांचे सेवन केले जाते. इतर कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत. चला तर जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगाची माहिती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सण समारंभात हवाय पारंपरिक लुक! मग नक्की ट्राय करून पहा ‘या’ पद्धतीच्या स्टायलिश बुगड्या
३ ऑक्टोबर – पिवळा
४ ऑक्टोबर – हिरवा
५ ऑक्टोबर – करडा
६ ऑक्टोबर – भगवा
७ ऑक्टोबर – पांढरा
८ ऑक्टोबर – लाल
९ ऑक्टोबर – निळा
१० ऑक्टोबर – गुलाबी
११ ऑक्टोबर – जांभळा
१२ ऑक्टोबर – दसरा
हे देखील वाचा: शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी पठन करा शनि चालिसा
पिवळा : पिवळा रंग ‘अष्टभुजा’ देवीचा खास रंग आहे. यंदाच्या नवरात्रीमध्ये पिवळ्या रंगाचे साडी देवीला नेसवली जाते. पिवळा रंग म्हणजे संपत्ती आणि स्नेहाचं प्रतिक.
हिरवा: हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतिक आहे. तसेच हा रंग स्कंदमाता देवीचा आवडता रंग आहे.
करडा: नवरात्री उत्सवात दरवर्षी करडा हा असतोच. कात्यायनी देवीचा आवडता म्हणजे करडा रंग.
भगवा: भगवा रंग म्हणजे भक्ती आणि शांततेचा प्रतीक मानला जातो.
पांढरा: पांढरा रंग म्हणजे स्वच्छ आणि साफ.
लाल: लाला रंग शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. हा रंग ‘ब्रम्हचारिणी’ देवीचा आवडता रंग आहे.
निळा: निळा रंग म्हणजे सुंदरता, दृढ विश्वासाचा. निळा रंग हा महागौरी देवीचा आवडता रंग आहे.
गुलाबी: गुलाबी रंग म्हणजे प्रेम आणि सद्भाव.
जांभळा: जांभळा रंग हा चंद्रघंटा देवीचा आवडता रंग आहे. हा रंग साहस आणि सत्याचं प्रतिक मानले जाते.