फोेटो सौजन्य - Social Media
प्रत्येकाला सुंदर दिसायची आवडत असते. मुलगी असो वा मुलगा, प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याची तसेच शरीराची नेहमी काळजी घेत असतात. आताच्या काळात मुलांमध्ये नियमितपणे व्यायाम करण्याची सवय खूप सामान्य झाली आहे, जी अतिशय चांगली पद्धत आहे. परंतु, कधी कधी शरीरावरील डाग किंवा फोड्या एखाद्याच्या बाह्य सौंदर्यास कमी करण्याचे काम करत असते. खरे सौंदर्य हा त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. पण पहिल्यांदा कुणाच्याही नजरेत व्यक्तीच बाह्य सौंदर्यच येते. त्यामुळे ते जपण्यात आजकालचे तरुण-तरुणी खूप कष्ट घेत असतात. कधी कधी बाहेरील रासायनिक पदार्थांचा चेहऱयावर अतिवापर केल्याने चेहऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी अतिशय सामान्य समस्या म्हणजे चेहऱ्यावर येणारे चट्टे!
हे देखील वाचा : काय आहे Mild Heart Attack? 5 लक्षणांनी ओळखा आणि मृत्यू टाळा
चेहऱ्यावर येणारे चट्ट्यांनी बहुतेक लोकं त्रासले आहेत. महत्वाचे म्हणजे तीव्र ऊन तर कधी कधी हार्मोन्समधील बदल या चट्ट्यांना कारणीभूत असतात. काही इतर कारणांमुळेही अशा समस्या उद्भवू शकतात. परंतु, यांना वेळीच रोखणे कधीही उत्तम पर्याय ठरू शकते. पण काही लोकं याला थांबवण्याच्या प्रयत्नात यांच्या आणखीन वाढीस उत्तेजित करतात. बाजारात जाऊन केमिकल प्रोडक्ट्स आणतात आणि चेहऱ्यला केमिकल लावून त्यांची आणखीन वाढ करतात. त्यामुळे अशा वेळेत बाजरात मिळणारे केमिकल प्रोडक्ट्स कधीही लांब ठेवलेले उत्तम असते. जर तुम्हीही चेहऱ्यवरील चट्ट्यांपासून त्रासले आहात तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यावरील चट्टे दूर करण्याची अतिशय सोपी आणि घरघुती पद्धत:
लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे जे चट्टे काढून टाकण्यास मदत करू शकते. दररोज झोपण्यापूर्वी लिंबाचा रस चट्ट्यांवरती लावा आणि सकाळी अंघोळीदरम्यान ते धुवून घ्या. त्याचबरोबर दहीही फायदेशीर ठरू शकते. दह्यामधील लॅक्टिक ऍसिड त्वचेला एक्सफोलिएट करतो. याने चेहऱ्यवरील चट्ट्यांना कमी करण्यास मदत होते. यासाठी चेहऱ्यावर दही लावा आणि ते १० ते १५ मिनिटांनी चांगले धुवून घ्या. टोमॅटोमधील लाईकोपिन एंटीऑक्सिडन्ट म्हणून काम करते. टोमॅटोचा आतील भाग चेहऱ्यावर लावून २० मिनिटांनी चेहरा धुवून घेतल्यावर मोठ्या प्रमाणात मदत मिळेल. त्याचबरोबर बटाट्यामधील कॅटेचोलास एंजाइम त्वचेला हलके करते, म्हणून बटाटयाच्या रसाला चट्ट्यांवर उपाय म्हणूनही वापरले जाते.