सौम्य हृदयविकाराचा झटका म्हणजे नेमकं काय
हृदयविकाराचा झटका ही एक घातक वैद्यकीय स्थिती आहे. परंतु काहीवेळा त्याची लक्षणे इतकी स्पष्ट नसतात की एखादी व्यक्ती लगेच आपल्याला हार्ट अटॅक येत आहे हे ओळखू शकेल. जेव्हा हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे सौम्य असतात तेव्हा त्याला “सौम्य हृदयविकाराचा झटका” अर्थात माईल्ड हार्ट अटॅक असे म्हणतात.
नुकतेच, ‘ये रिश्ता क्या कहता है’ मधील 32 वर्षीय अभिनेता मोहसिन खान याने सोशल मीडियावर खुलासा केला आहे की, एक वर्षापूर्वी त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता, त्यानंतर त्याने कामातून ब्रेक घेतला होता. कोणालाही माईल्ड हार्ट अटॅक येऊ शकतो. पण त्याआधी माईल्ड हार्ट अटॅकची लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. डॉक्टर माधव भागवत यांनी काही लक्षणे स्पष्ट केली आहेत (फोटो सौजन्य – iStock)
छातीत हलकीशी अस्वस्थता
छातीत थोड्या थोड्या वेळाने अस्वस्थ वाटणे
सौम्य हृदयविकाराच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे छातीत अस्वस्थता. ही अस्वस्थता जडपणा किंवा दबावाच्या स्वरूपात जाणवू शकते. कधीकधी ते जळजळ म्हणून देखील अनुभवले जाऊ शकते. हे लक्षण काही काळासाठी उद्भवते आणि अचानक किंवा हळूहळू सुरू होऊ शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्या जीवावर बेतू शकते
श्वास लागणे
जर तुम्हाला कोणत्याही विशेष शारीरिक श्रमाशिवाय श्वासोच्छवासाच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ते सौम्य हृदयविकाराचे लक्षण असू शकते. श्वास घेण्यास त्रास होत असताना तुम्हाला छातीत दाब किंवा वेदना जाणवू शकतात. तुम्हाला सतत कामाशिवायही श्वास लागत असेल तर तुमच्या डॉक्टरांना वेळीच दाखवा
हेदेखील वाचा – 1-2 नाही तर 10 दिवस आधी मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, 6 लक्षणे माहीत असायलाच हवीत
सर्दी वा थंडी वाजणे
अचानक थंडी वाजणे वा घाम येणे
हृदयविकाराच्या झटक्याच्या लक्षणांमध्ये काहीवेळा थंडी वाजणे वा अचानक सर्दी होणे यांचा समावेश होतो. यामध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अचानक थंडी वाजणे किंवा घाम येणे यांचा समावेश असू शकतो. हे लक्षण विशेषतः रात्री किंवा तुम्ही विश्रांती घेत असताना जाणवू शकते.
असामान्य थकवा
अचानक किंवा कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय अत्यंत थकवा येणे हे देखील माईल्ड हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. हा थकवा अगदी सामान्य शारीरिक हालचालींदरम्यानही जाणवू शकतो. मात्र त्या थकव्याचा थेट संबंध तुमच्या हृदयाशी असू शकतो, ज्याची तुम्हाला कल्पनाही नाहीये.
हेदेखील वाचा – भारतीयांना सतत का जाणवतो हार्ट अटॅकचा त्रास? जाणून घ्या पहिल्या स्टेजची लक्षणे
हातपाय दुखणे
हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये हात, खांदे किंवा मान यांसारख्या बाह्य अवयवांमध्ये वेदनादेखील असू शकतात. ही वेदना सामान्य वेदनांपेक्षा वेगळी असते आणि ती शरीराच्या एक किंवा अधिक भागात पसरू शकते. काहीवेळा ही वेदना अतिशय सौम्य असते आणि ती व्यक्ती सामान्य वेदना मानू शकते.
माईल्ड हार्ट अटॅक किती धोकादायक?
किती धोकादायक ठरू शकतो?
माईल्ड हार्ट अटॅक हृदयाच्या एका लहान भागावर परिणाम करतो. परंतु याचा अर्थ असा नाही की हा आजार गांभीर्याने घेऊ नये. हृदयविकाराच्या सौम्य झटक्यामुळे जीवघेणी गुंतागुंत उद्भवू शकते जी तुमच्या उर्वरित आयुष्यावर परिणाम करू शकते आणि तुम्हाला मृत्यूच्या खाईत ढकलू शकते.