
फोटो सौजन्य - Social Media
डॉक्टर सतत सल्ला देत असतात कि खाण्यात साखरेचे प्रमाण कमी असावे अन्यथा शरीर विकारांना बळी पडतो. साखरेच्या जास्त सेवनाने शरीरातील साखर तर वाढतेच त्याचबरोबर त्या व्यक्तीला आयुष्यभर शुगरच्या त्रासाला बळी पडावे लागते. शुगरचे त्रास असलेला व्यक्ती आयुष्यभर एका विकाराला आहारी जातो तो म्हणजे डायबिटीज होय. साखरेत असणारे अनेक घटक शरीरासाठी लाभदायक असतात, पण हे तेव्हाच जेव्हा सेवनात असणारी साखर नैसर्गिक असते. अन्यथा अधिक प्रमाणात सेवन केलेले साखर शरीराला फक्त नि फक्त त्रास देते.
हे देखील वाचा : IVF प्रक्रियेला घाबरुन जाऊ नका, तज्ज्ञांचा सल्ला
याकारणाने सेवनात साखर कमीच असावी. बाजारात मिळणारी साखर ही मानवनिर्मित असून विविध प्रक्रियेनंतर ती पॅक केली जाते आणि बाजारात विकायला आणली जाते. तेच मिठाच्या बाबतीतही घडते. बाजारात मिळणारे मीठही विकण्यास येण्यापूर्वी अनेक प्रक्रियांमधून बाहेर पडते. या मानवनिर्मित साखर आणि मीठांमध्ये प्रक्रिये दरम्यान छोटे छोटे प्लास्टिकचे कण मिक्स होतात. हे मायक्रोप्लास्टिक मीठ आणि साखरेच्या सेवनादरम्यान आपल्या पोटात जातात आणि विविध विकाराच्या आमंत्रणाला कारणीभूत ठरतात.
मायक्रोप्लास्टिक साखर आणि मिठाच्या मार्फत आपल्या पोटात जातो. त्यामुळे शरीराला खूप काही भोगावे लागू शकते. पोटाच्या समस्या, हृद्यासंबंधित समस्या तसेच कर्करोगासारख्या विकारांना शरीर बळी पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सॅलेड, कॉफी किंवा चहासारख्या पदार्थांसाठी एक्सट्रा शुगर किंवा मीठ मागताना थोडासा विचार करत चला. कारण तुम्ही मीठ आणि साखरेच्या माध्यमातून प्लास्टिकचे लहान कण ग्रहण करणार आहात आणि विकारांना आमंत्रण देणार आहात.
जेवणात जास्त मीठाचे सेवन केल्याने हृदयाच्या संबंधित विकार होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर मीठामध्ये सोडिअम जास्त प्रमाणात असतात, ज्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. सोडिअमच्या अति सेवनाने फ्लूड रिटेन्शन वाढते. आजकाल लहान वयातही हृदयविकार तसेच बीपीची समस्या दिसून येते याला मुख्य कारण सोडिअमचे अतिसेवनही आहे. तसेच साखरेच्या अतिसेवनाने शरीरातील ब्लड वेसल्सवर खुयप जोर पडतो ज्याने शरीराला फक्त नि फक्त नुकसान होते. साखरेच्या अतिसेवनाने लठ्ठपणा वाढीस लागतो.