ताप, संसर्ग,सर्दी, खोकल्यावर तुम्ही ही औषध तर घेत नाही ना? या धोकादायक औषधांवर सरकारने घातली बंदी
ताप, सर्दी, खोकल्या या आजारांवर सर्व सामन्यांच्या घरामध्ये अनेकदा प्रत्येक आजारावर किंवा दुखण्यावरची औषधे ठेवण्याची एक सवय प्रत्येकाला लागली आहे. अशामध्ये आता केंद्र सरकारने काही औषधांवर बंदी आणली असून यामध्ये सर्वसामान्यांच्या घरामध्ये आढळणाऱ्या औषधांचाही समावेश आहे. नुकतेच केंद्र सरकारने एक यादी जाहीर केली असून 156 औषधांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. कारण या औषधांचा मानवी शरीरावर हानिकारक प्रभाव पडत होता. सरकारने 12 ऑगस्ट 2025 रोजी जारी केलेल्या राजपत्रात या एकत्रित औषधांवर बंदी घातली आहे. ही औषध कोणती आहे जाणून घ्या…
केंद्र सरकारने औषधांच्या कॉकटेलवर कात्री लावली आहे. औषधांचा कॉकटेल म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? औषधांचे कॉकटेल म्हणजे अनेक प्रकारची औषधे एकत्र करून नवीन नावाने विकणे. उदाहरणार्थ, एखाद्याला वेदना आणि ताप असल्यास, डॉक्टर दोन औषधे लिहून देतात: मेफेनॅमिक ऍसिड आणि पॅरासिटामॉल. आता अनेक कंपन्या ही दोन औषधे विशिष्ट प्रमाणात मिसळून वेगळ्या नावाने विकतात. अशा औषधांना निश्चित डोस संयोजन म्हणतात. भारतीय बाजारपेठेत अशी हजारो औषधे आहेत. भारत सरकारच्या तज्ञ समितीने यापैकी 156 एकत्रित औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या औषधांचा मानवी शरीरावर हानिकारक प्रभाव पडत होता. सरकारने 12 ऑगस्ट 2025 रोजी जारी केलेल्या राजपत्रात या एकत्रित औषधांवर बंदी घातली आहे.