Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोप अपूर्ण होत असेल तर शरीर देतं हे संकेत ; आजच टाळा या गोष्टी अन्यथा होतील गंभीर परिणाम

तुमच्या झोपेच्या चुकीच्या पद्धतींमुळे देखील अनेक जणं शारीरिक आणि मानसिकरित्या आजारी पडतात. याबाबत आरोग्यतज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊयात...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 12, 2025 | 03:20 AM
झोप अपूर्ण होत असेल तर शरीर देतं हे संकेत ; आजच टाळा या गोष्टी अन्यथा होतील गंभीर परिणाम
Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या धावपळीच्या जगात सर्वात महाग काय झालं असेल तर ती म्हणजे झोप. ऑफिस, प्रवास आणि घरची कामं यासगळ्यात गृहिणी असो वर्किंग वुमन असो किंवा पुरुष वर्ग देखील शरीराला पाहिजे तितकी झोप होत नाही आणि यामुळे हळूहळू शरीरावर गंभीर परिणाम व्हायला सुरुवात होते. आजकाल फक्त जंकफूडच नाही तर तुमच्या झोपेच्या चुकीच्या पद्धतींमुळे देखील अनेक जणं शारीरिक आणि मानसिकरित्या आजारी पडतात. याबाबत आरोग्यतज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊयात…

झोप अपूर्ण होत असेल तर शरीरावर आणि मनावर अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, झोपेत शरीरातील पेशी दुरुस्त होतात आणि हार्मोन्सचं संतुलन राखलं जातं. मात्रशी झोप न झाल्यास याचा परिणाम देखील शरीरावर होतो.
जसं की,

एकाग्रता कमी होते: झोपेअभावी मेंदूला योग्य विश्रांती मिळत नाही, त्यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.

स्मरणशक्ती कमी होते: झोपेत मेंदू माहिती प्रक्रिया करतो, झोप कमी झाली तर आठवण ठेवण्याची क्षमता घटते.

तणाव आणि चिडचिड वाढते: झोपेअभावी मेंदूत तणाव वाढतो याचं कारण म्हणजे  हार्मोन्समध्ये होणारे बदल, त्यामुळे सतत अशांत वाटणं किंवा   तणाव जाणवत राहतो.

नैराश्य व चिंता वाढते: सतत झोप अपूर्ण राहिल्याने  मानसिक आजारांची शक्यता वाढते. या सगळ्यामुळे मानसिक आरोग्याबाबत अनेक आव्हानं दिसून येतात. मानसिक आरोग्याप्रमाणे शारीरिक आरोग्याच्या देखील तक्रारी सुरु व्हायला लागतात.

थकवा आणि अशक्तपणा: शरीराला विश्रांती न मिळाल्याने दिवसभर थकवा जाणवतो.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होते: झोप अपुरी असल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते  आणि वारंवार सर्दी-खोकला, इन्फेक्शन होऊ शकतात.

वजन वाढणे: अपुरी झोप हार्मोनल असंतुलन निर्माण करते , त्यामुळे भूक जास्त लागते आणि वजन वाढते.

हृदयविकाराचा धोका: झोपेअभावी रक्तदाब आणि हृदयाचा ताण वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.

त्वचेवर परिणाम: झोप अपुरी असल्याने त्वचेवर काळी वर्तुळे, कोरडेपणा आणि अकाली सुरकुत्या दिसतात.दररोज ७ ते ८ तासांची झोप प्रौढ व्यक्तींसाठी आवश्यक आहे. झोपेचं वेळापत्रक नियमित ठेवणं, झोपण्यापूर्वी मोबाइलचा वापर टाळणं आणि मन शांत ठेवणं यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.

Web Title: What are the physical and mental effects of insufficient sleep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 03:20 AM

Topics:  

  • mental health
  • sleep problems

संबंधित बातम्या

अंघोळ करण्यात पाण्यात टाका ‘हा’ पांढरा पदार्थ, थकवा- तणावासोबतच त्वचेच्या सर्वच समस्या होतील कायमच्या गायब
1

अंघोळ करण्यात पाण्यात टाका ‘हा’ पांढरा पदार्थ, थकवा- तणावासोबतच त्वचेच्या सर्वच समस्या होतील कायमच्या गायब

Mental Stress कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना आणि मानेला करा तेलाने मसाज, कायमच राहाल फ्रेश
2

Mental Stress कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना आणि मानेला करा तेलाने मसाज, कायमच राहाल फ्रेश

World Mental Health Day 2025: शांतताप्रिय आयुष्यासाठी लाऊन घ्या 5 सवयी, मानसिक आरोग्य राहील उत्तम
3

World Mental Health Day 2025: शांतताप्रिय आयुष्यासाठी लाऊन घ्या 5 सवयी, मानसिक आरोग्य राहील उत्तम

कशाला घेता उगाच तणाव अन् टेन्शन; सतत देत रहा एकमेकांना मोटिव्हेशन
4

कशाला घेता उगाच तणाव अन् टेन्शन; सतत देत रहा एकमेकांना मोटिव्हेशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.