Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतम अदानीला पुन्हा मोठा धक्का! आता श्रीमंतांच्या यादीत आता थेट 25 व्या क्रमांकावर, फक्त एवढी संपत्ती राहिली शिल्लक

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी सध्या 83.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 20, 2023 | 02:33 PM
गौतम अदानींचा विक्रम! काही तासांत कमावले 73 हजार कोटी रुपये, एकूण संपत्तीतही झालीये भरघोस वाढ!

गौतम अदानींचा विक्रम! काही तासांत कमावले 73 हजार कोटी रुपये, एकूण संपत्तीतही झालीये भरघोस वाढ!

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : अचानक प्रसिद्धी काही क्षणांत निघून जाते, असे म्हणतात. काळाचे फासे कधी वळतील आणि कोणी श्रीमंताकडून भिकाऱ्याकडे आणि भिकाऱ्याकडून श्रीमंताकडे कधी वळेल हे कोणीही सांगू शकत नाही. असेच काहीसं गौतम अदानीसोबत (Gautam Adani) घडत आहे, ज्यामुळे तो बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्याने जितक्या लवकर उंची गाठली, तितक्याच वेगाने तो खाली आला. होय, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत 25 व्या क्रमांकावर आहेत. आता सध्या त्यांची संपत्ती किती आहे (Gautam Adani Net Worth) जाणून घेऊया .

[read_also content=”I Phone च्या हवास्यापोटी डिलिव्हरी बॅायची केली हत्या, मृतदेह तीन दिवस घरात ठेवला आणि बाहेर नेऊन… https://www.navarashtra.com/crime/karnataka-man-kills-delivery-boy-keeps-body-at-home-for-4-days-nrps-370880.html”]

टॉप-20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

गेल्या काही दिवसांपासून हिंडेनबर्गच्या अहवालानंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. आपल्या सर्वांना माहीत आहे की, हिंडनबर्ग अहवालानंतर, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि कंपन्यांचे बाजार भांडवल (Mcap) जवळपास निम्म्यावर आले. यामुळे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जगातील टॉप-20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. इतकंच नाही तर भूतकाळातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांचा दर्जा सातत्याने कमी होत आहे. सोमवारी, तो ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत 25 व्या स्थानावर घसरला. अशा प्रकारे गौतम अदानी तिसऱ्या क्रमांकावरून घसरले गौतम अदानी २४ जानेवारीपर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते.

गेल्या वर्षी ‘या’ कारणामुळे आले होते चर्चेत 

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर त्याच्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात कमालीची घट झाली. यामुळे तो जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत खाली घसरत राहिला. अदानी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील 10 व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनला होता. सप्टेंबर 2022 मध्ये, गौतम अदानी $ 155 अब्ज मालमत्तेसह जगातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या रँकवर पोहोचले. मात्र या वर्षी जानेवारीच्या अखेरीस आलेल्या हिंडेनबर्ग अहवालाने गौतम अदानींना मोठा धक्का दिला आहे.

आता मालमत्ता किती ?

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची नेट वर्थ $49.1 बिलियन झाली आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी, गौतम अदानी यांची एकूण मालमत्ता $ 52.4 अब्ज होती. त्याच्या संपत्तीत केवळ तीन दिवसांत सुमारे $3 बिलियनची घट झाली आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे ते अब्जाधीशांच्या यादीत तर खाली घसरले आहेतच पण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा ताजही त्यांनी गमावला आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी संपत्तीच्या बाबतीत अदानीपेक्षा खूप पुढे गेले आहेत.

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीतील फरक पाहा

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या मालमत्तेत आता सुमारे $34 अब्जांचा फरक आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी सध्या 83.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. बर्याच काळापासून, गौतम अदानी सोबत, आणखी एक भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी देखील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत आपला दबदबा कायम ठेवत होते, परंतु त्यांच्या नेट वर्थमध्येही चढ-उतार होताना दिसत आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट पहिल्या क्रमांकावर आहे फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट हे टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहेत. त्यांची एकूण संपत्ती $192 अब्ज आहे. त्याच वेळी, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क $ 187 अब्ज संपत्तीसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 121 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अॅमेझॉनचे जेफ बेझोस हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर, 117 अब्ज डॉलर्ससह बिल गेट्स आणि 107 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह वॉरेन बफे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या श्रीमंत आहेत. या प्रकाराने गौतम अदानींना मोठा धक्का बसला आहे.

Web Title: %e0%a4%85%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be %e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a4%be %e0%a4%a7%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2023 | 02:33 PM

Topics:  

  • Gautam Adani
  • richest person

संबंधित बातम्या

Raj Thackeray On BJP : गैरव्यापार करणाऱ्या अदानी समुहावर भाजपाची कृपादृष्टी; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका
1

Raj Thackeray On BJP : गैरव्यापार करणाऱ्या अदानी समुहावर भाजपाची कृपादृष्टी; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

Adani Group MSRDC Project: वांद्रे रेक्लेमेशनचा कायापालट! तब्बल ‘इतक्या’ कोटींचे एमएसआरडीसीच्या पुनर्विकास टेंडर अदानी ग्रुपला
2

Adani Group MSRDC Project: वांद्रे रेक्लेमेशनचा कायापालट! तब्बल ‘इतक्या’ कोटींचे एमएसआरडीसीच्या पुनर्विकास टेंडर अदानी ग्रुपला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.