ED Raid: कर्नाटकचे काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र यांना शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्याची माहिती समोर आली आहे. . शुक्रवारी ईडीने वीरेंद्र यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली. या कारवाई १२ कोटींहून अधिक रोख रक्कम, सोने-चांदी जप्त करण्यात आली आहे. याशिवाय एक कोटींहून अधिक रुपयांचे परकीय चलनदेखील जप्त कऱण्यात आले आहेत .
बेंगळुरूत ईडीने २२ आणि २३ ऑगस्ट रोजी देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी करत बेकायदेशीर सट्टेबाजी आणि ऑनलाइन गेमिंग रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील आमदार के.सी वीरेंद्र आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
India Richest CM: आपले मुख्यमंत्री किती “मालदार”? ADR चा अहवाल वाचून येईल भोवळ, म्हणाल पैसाच पैसा…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या या कारवाईत १२ कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या पथकांनी एकाच वेळी गंगटोक, चित्रदुर्ग, बेंगळुरू, हुबळी, जोधपूर, मुंबई आणि गोवा यांसह ३१ ठिकाणी छापे टाकले. गोव्यातही ईडीने पप्पीज कॅसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स कॅसिनो, पप्पीज कॅसिनो प्राइड, ओशन ७ कॅसिनो आणि बिग डॅडी कॅसिनो या पाच मोठ्या कॅसिनोवर छापे टाकले. या कारवाईत ईडीने १२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली, ज्यामध्ये १ कोटी रुपये परकीय चलन, ६ कोटी रुपयांचे सोने, १० किलो चांदी आणि चार आलिशान कारचाही समावेश आहे. या कारवाईनंतर ईडीने १७ बँक खाती आणि २ लॉकर देखील गोठवले आहेत.
ईडीच्या तपासानुसार, आमदार वीरेंद्र हे किंग५६७ आणि राजा५६७ सारख्या अनेक ऑनलाइन बेटिंग साइट्स चालवत होते. त्यांचे भाऊ के.सी. थिप्पास्वामी दुबईहून डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नॉलॉजीज आणि प्राइम ९ टेक्नॉलॉजीज या तीन कंपन्यांद्वारे हा व्यवसाय सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय दुसरा भाऊ के.सी. नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एन. राज हे देखील या कामात सहभागी असल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.
याशिवाय ईडीला छापेमारी दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे देखील सापडल्याची माहिती आहे. या कागदपत्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांनी बेकायदेशीर कमाई कायदेशीर दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता. काही दिवसांपूर्वी के.सी. वीरेंद्र देखील त्यांच्या साथीदारांसह गंगटोकला गेले होते. तिथे त्यांनी लँड कॅसिनो भाड्याने घेण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी ईडीने त्यांना गंगटोकमधून अटक केली. त्यानंतर आज (२३ ऑगस्ट) त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर, ईडीने त्याला बेंगळुरू न्यायालयात नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मिळवला.