निक्की तांबोळीचा उषा नाडकर्णींवर पलटवार (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
निक्की तांबोळी आणि उषा नाडकर्णी या दोन्ही अभिनेत्री अशा आहेत, ज्या मनात जे असेल तर बिनधास्त बोलतात आणि त्यामुळे अनेकदा वाद ओढवून घेतात आणि आता असाच एक नवा वाद निर्माण झालाय. लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत निक्की तांबोळीला अहंकारी म्हटले आणि ती स्वतःला मोठी समजत असून आपल्याशी बोलत नव्हती असाही आरोप केला होता.
आता निक्की तांबोळीने यावर प्रतिक्रिया देत उषा नाडकर्णी यांना उत्तर दिले आहे. निक्की तांबोळी आणि उषा नाडकर्णी या दोघांनीही ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये एकत्र काम केले होते.
उषा नाडकर्णी यांनी मुलाखतीत निक्की तांबोळीच्या वागण्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या, ज्या उषा नाडकर्णी यांना अजिबात आवडल्या नाहीत. उषा नाडकर्णी यांच्या आरोपांबद्दल ‘IANS’शी बोलताना निक्की म्हणाली की, ‘मी जशी आहे तशीच आहे आणि थेट गोष्टी सांगते, पण यामुळे मी अहंकारी होत नाही. मी कधीही ढोंग केले नाही. त्याऐवजी, मी खऱ्या दिसण्यावर विश्वास ठेवते. मला वाटते की माझे चाहते मला याच कारणासाठी पसंत करतात.’
गोविंदा-सुनीता खरंच घेणार का घटस्फोट? वकिलाने केली पोलखोल, जाणून घ्या सत्यता
उषा नाडकर्णी यांनी निक्कीला अहंकारी म्हटले असून यावर आता अत्यंत रागात निक्कीने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, ‘मला उषाजींबद्दल खूप आदर आहे. तुम्ही वरीष्ठ आहात आणि मी कनिष्ठ आहे, आणि मी तुमची प्रशंसा करत नाही किंवा प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोलू शकता. कृपया मला अहंकारी समजू नका. मला माझे व्यक्तिमत्व माहीत आहे. आणि माझ्या चाहत्यांनाही मी कशी आहे हे माहीत आहे. मी तुमचा आदर करते, पण मी तुम्हाला इतकंच सांगते की मला Judge करण्याचा अधिकार कोणालाही नाही.’
‘Pinkvilla’ला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी निक्कीला अहंकारी म्हटले होते हे सर्वांनाच माहीत आहे. जेव्हा उषा नाडकर्णी यांना विचारण्यात आले की तिला निक्की आवडते का, तेव्हा उषा नाडकर्णी म्हणाल्या, ‘मला बकवास आवडत नाही. मला निक्कीवर राग नाही, पण ती फारच मोठी आहे बाबा! आपण सर्वजण मोठे आणि लहान असे व्यक्तीमत्त्व आहोत.’
पुढे उषा नाडकर्णी म्हणाल्या होत्या की, ‘आपण जास्त बडबड नाही करायची, लहान आहोत तर तसंच रहायचं. जास्त मोठ्या लोकांशी मी बोलायचा प्रयत्न करत नाही, कारण ती (निक्की) जास्त बोलत नाही, कधीच कोणाशी मिळूनमिसळून राहत नाही’ याच मुलाखतीमध्ये उषा नाडकर्णीने अनेक खुलासे केले होते. आपल्या एकटं राहण्याबाबतही सांगितले आणि याशिवाय ‘Gully Boy’ जेव्हा ऑडिशन द्यायला उषा नाडकर्णी गेल्या होत्या तेव्हा स्क्रिप्ट फेकून कशा आल्या होत्या याबाबतही त्यांनी खुलासा यावेळी केला होता. आता निक्कीने उत्तर दिल्यावर उषा नाडकर्णींची प्रतिक्रिया काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Bigg Boss 19 मध्ये होणार राजकीय नेत्यांची एंट्री? ‘ही’ दोन नाव चर्चेत