
तांदळाच्या दरात पुन्हा वाढ; बासमती तांदळाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली : महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर आता तांदळाच्या वाढत्या दरानेही दबाव वाढला आहे. कांदा आणि खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतींच्या पार्श्वभूमीवर तांदळाच्या दरातील तेजीने घराचे मासिक बजेट बिघडवले आहे. गेल्या सुमारे दोन महिन्यांत बाजारात तांदळाच्या अनेक प्रमुख प्रकारांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कोलम तांदळाची किंमत आता सुमारे ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी हाच तांदूळ ५५ ते ६० रुपये किलो दराने मिळत होता. त्याचप्रमाणे जयश्रीराम तांदूळ आता सुमारे ८० रुपये किलो दराने विकला जात असून, दोन महिन्यांपूर्वी त्याची किंमत सुमारे ६५ रुपये किलो होती.
महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ
दरवाढीला कमी पावसाचा हातभार धान्य व्यापारी कमलाकर घाटोळे यांनी सांगितले की, विदर्भासह अनेक भागांत कमकुवत मान्सून आणि कमी पावसामुळे तांदळाची उपलब्धता व किमतीवर परिणाम झाला आहे. घाऊक बाजारात किंचित दर कमी झाले असले, तरी किरकोळ बाजारात वाढ झाली आहे. किरकोळ महागाईत तांदळाचा वाटा सुमारे ५.८८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. दोन महिन्यांपूर्वी ५५ ते ६० रुपये किलो असलेला कोलम आता ७५ रुपये, तर ६५ ते ७० रुपये किलो असलेला जयश्रीराम सुमारे ८० रुपये किलो झाला आहे.
चिन्नोरने ओलांडला 100 रुपयांचा टप्पा
किराणा व्यापाऱ्याने सांगितले की, तांदळाच्या महागाईत प्रीमियम प्रकारही मागे राहिलेले नाहीत. चिन्नोर तांदळाची किंमत १०० ते ११० रुपयांपेक्षा अधिक प्रति किलो झाली आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचा किंवा विशिष्ट प्रकारचा तांदूळ पसंत करणाऱ्या कुटुंबांनाही याचा फटका बसत आहे. बाजारात बासमती तांदळाच्या किमतीत सुमारे १५ ते २० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. तर गैर-बासमती तांदूळ २० ते २५ टक्क्यांनी महागला आहे.
महागाईत होतेय वाढ
महागाईने आपले रौद्ररूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. घाऊक आणि किरकोळ महागाईची नवीन आकडेवारी पाहता सर्वसामान्यांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही चिंतेत सापडले आहे. आगामी काळात लोकांच्या खिशाला मोठा फटका बसणार असून, प्रत्येक वस्तूसाठी अधिक मोजावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.
Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट