Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेहुल चोक्सीच्या वकिलाला २५ हजारांचा दंड! सुनावणीवर स्थगिती मागितल्याने न्यायालयाचे आदेश

चोक्सीची याचिका गहाळ झाल्याची माहिती चोक्सीच्यावतीने बाजू मांडणारे अँड. राहुल अग्रवाल यांनी न्यायालयाला मागील सुनावणीदरम्यान दिली होती. करोना काळात कार्यालय स्थलांतरित करत असताना कागदपत्र गहाळ झाल्याची कबूली त्यांना दिली आणि याचिकेची पुनर्रचना करण्यासाठी वेळ देण्याची विनंतीही न्यायालयाकडे केली

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 18, 2023 | 08:20 AM
मेहुल चोक्सीच्या वकिलाला २५ हजारांचा दंड! सुनावणीवर स्थगिती मागितल्याने न्यायालयाचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: पीएनबी बॅंक घोटाळ्यातील (PNB Bank Scam) फरार आरोपी आणि हिऱ्याचे व्यापारी मेहुल चोक्सीच्या (Mehul Choksi) गहाळ याचिकेची प्रमाणित प्रत अद्याप न मिळाल्याने सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी चोक्सीच्या वतीने शुक्रवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. मात्र, त्यावर नाराजी व्यक्त करून चोक्सीच्या वकिलांना २५ हजारांचा दंड ठोठावला. तसेच दंडाची रक्कम केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) जमा करण्याचे आदेश दिले.

[read_also content=”तप्रधान मोदींनी आणीबाणी जाहीर करण्याची हिंमत दाखवावी, पर्यायाचा विचार न करता जनतेनं देशातील हुकूमशाही थांबवायला हवी; उद्धव ठाकरेंचा संताप https://www.navarashtra.com/maharashtra/prime-minister-modi-should-show-courage-to-declare-emergency-says-uddhav-thackeray-nrka-370375.html”]

चोक्सीची याचिका गहाळ झाल्याची माहिती चोक्सीच्यावतीने बाजू मांडणारे अँड. राहुल अग्रवाल यांनी न्यायालयाला मागील सुनावणीदरम्यान दिली होती. करोना काळात कार्यालय स्थलांतरित करत असताना कागदपत्र गहाळ झाल्याची कबूली त्यांना दिली आणि याचिकेची पुनर्रचना करण्यासाठी वेळ देण्याची विनंतीही न्यायालयाकडे केली. तेव्हा, एवढ्या मौल्यवान अशिलाचे कागदपत्र गहाळ होण्याची जोखीम तुम्ही कशी घेऊ शकता? अशी खोचक विचारणा खंडपीठाने अग्रवाल यांना केली. त्यानुसार, शुक्रवारी न्या. एन. डब्ल्यू. सांबरे आणि आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा, उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमधून स्वत:च्या याचिकेची प्रमाणित प्रत मिळवण्यासाठी अर्ज केला होता. परंतु अद्याप त्यांना ती मिळालेली नसल्यामुळे १८ फेब्रुवारीपर्यंत चोक्सीची याचिका मिळू शकते आणि त्यामुळे आणखी काही वेळ देण्यात यावा, असे अग्रवाल म्हणाले. मात्र, न्यायालयाने त्यंची मागणी फेटाळून लावत त्यांना २५ हजारांचा दंड ठोठावला.

पंजाब नॅशनल बँकेला १३,४०० कोटींना गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबकबिल्यासह देशातून पसार झाले आहेत. यांच्याविरोधात ईडीने पीएमएल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून सीबीआयदेखील यांच्या मागावर आहे. वारंवार चौकशीचे समन्स बजावूनही चोक्सी भारतात येऊन न्यायालय आणि तपासयंत्रणेपुढे हजर न झाल्यामुळे तपासयंत्रणेने साल २०१८ च्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आणि कायद्यानुसार चोक्सीची जप्त केलेल्या सर्व संपत्तीवर टाच आणली. चोक्सीने २०१९ रोजी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Web Title: 25000 fine to mehuchoksis lawyer court order seeking adjournment of hearing nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2023 | 08:20 AM

Topics:  

  • Mehul Choksi

संबंधित बातम्या

Mehul Choksi कोणत्या तुरुंगात राहणार, कोणत्या सुविधा मिळणार? भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
1

Mehul Choksi कोणत्या तुरुंगात राहणार, कोणत्या सुविधा मिळणार? भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.