Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सैन्य दलावर आत्मघातकी हल्ला, भीषण स्फोटात २७ जवानांचा मृत्यू

नायजेरियाच्या उत्तर पूर्व भागात आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. नायजेरियाच्या घटनेत कमीत कमी २७ जवानांचा मृत्यू झाला आहे. यात काही कमांडर देखील होते. काही इतर लोक देखील या घटनेत जखमी झाले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 26, 2025 | 08:59 PM
सैन्य दलावर आत्मघातकी हल्ला, भीषण स्फोटात २७ जवानांचा मृत्यू

सैन्य दलावर आत्मघातकी हल्ला, भीषण स्फोटात २७ जवानांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

Nigeria Attack : नायजेरियाच्या उत्तर पूर्व भागात आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. नायजेरियाच्या घटनेत कमीत कमी २७ जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  नायजेरियाच्या सैनिकांनी बर्नो आणि योबे राज्यादरम्यान असणाऱ्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर आक्रमण केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला झाल्याचं वृत्त एएफपीने दिलं आहे.

सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘आत्मघातकी हल्ल्यात २७ सैनिक मारले गेले. यात काही कमांडर देखील होते. काही इतर लोक देखील या घटनेत जखमी झाले आहेत. मागील काही वर्षातील सर्वात मोठा आत्मघातकी हल्ला असल्याचं बोललं जात आहे.’आत्मघातकी हल्ला केला, त्यावेळी चारही बाजूला अंधार होता. यामुळे चारही बाजूंना सैनिकांना स्पष्ट दिसत नव्हतं. या हल्ल्यातील जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेलं वाहन झाडाझुडपात लपवून ठेवलं होतं. याच वाहनाला एका सैनिकाच्या वाहनाने धडक दिली. त्यानंतर हा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. ‘तिंबकटू त्रिकोण’ या भागात भीषण हल्ला झाला आहे. या आधी हा विभाग बोको हराम या संघटनेच्या ताब्यात होता.

ISWAP या संघटनेने 2016 साली बोको हराम या संघटनेतून फुटून उत्तर-पूर्व भागात दहशतवादी संघटना तयार केली. या संघटनेने आता बोको हरामच्या अड्ड्यावर कब्जा करणे सुरु केले आहे. यामध्ये तिंबकटू त्रिकोण आणि सांबिसा जंगलाचा समावेश आहे. ही संघटना रस्त्याच्या किनाऱ्यावरील खाणीत सुरुंग लावणे किंवा वाहनांमध्ये स्फोटके ठेवून सैनिकांना टार्गेट करते. जुलै महिन्यात सात सैनिक मारले गेले होते. त्यांच्या वाहनाने खाणीला धडक दिली होती.

अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याचं षडयंत्र

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पंजाब पोलिस सुरक्षा बहाल करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की,  ‘अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात आहे आणि त्यांना भाजप आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून धोका आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेत पंजाब पोलिस महत्त्वाची भूमिका बजावत होते, परंतु भाजपने कट रचला आणि निवडणुकीच्या अगदी आधी ही सुरक्षा काढून टाकली. अरविंद केजरीवाल यांच्यावरील आतापर्यंतच्या सर्व हल्ल्यांमध्ये हल्लेखोर भाजप कार्यकर्ते आहेत आणि पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. असही त्यांनी स्पष्ट केलं.

आतिशी म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांच्यावरील भाजपच्या हल्ल्यांमुळे दिल्लीतील जनतेचे त्यांच्यावरील प्रेम आणि विश्वास आणखी वाढत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची पंजाब पोलिस सुरक्षा काढून घेण्याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री आतिशी म्हणाले, “सध्या अरविंद केजरीवाल यांना मारण्यासाठी एक मोठे षड्यंत्र रचले जात आहे. या कटात दोन प्रमुख पक्ष सहभागी आहेत.

 

Web Title: 27 nigerian soldiers died in deadly attack between borno and yobe states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • army Soldier
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद
1

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद

“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा
2

“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा

Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी कारवाई ; जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं
3

Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी कारवाई ; जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं

Quadcopter : ना मिसाईल, ना बंदूक… या छोट्याशा शस्त्राने दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये माजवलीय दहशत
4

Quadcopter : ना मिसाईल, ना बंदूक… या छोट्याशा शस्त्राने दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये माजवलीय दहशत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.