Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेल कारखान्यात टँकर साफ करताना गुदमरून 7 मजुरांचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच लागले होते कामाला अन् आज…

आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात (Kakinada District) एक मोठी दुर्घटना घडली. तेल कंपनीत टॅंकरमध्ये गुदमरून सात मजूरांचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2023 | 03:30 PM
तेल कारखान्यात टँकर साफ करताना गुदमरून 7 मजुरांचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच लागले होते कामाला अन् आज…
Follow Us
Close
Follow Us:

काकीनाडा : आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात (Kakinada District) एक मोठी दुर्घटना घडली. तेल कंपनीत टॅंकरमध्ये गुदमरून सात मजूरांचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. पेद्दापुरम मंडलातील रागमपेटा गावात गुरूवारी तेल कारखान्यात टॅंकरची (Oil Tanker) साफसफाई सुरू होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळी साडेनऊच्या सुमारास मजुरांना तेल कारखान्यात असलेल्या टॅंकरची सफाई करण्यात सांगितले होते. रेडप्पा यांनी मॅनहोलमधून प्रथम टँकरमध्ये प्रवेश केला. काही वेळ त्याने प्रतिसाद न दिल्याने अन्य तीन मजूर टँकरमध्ये गेले. त्यांना देखील श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांनी आरडाओरड सुरू केली, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर अन्य तीन मजूर त्यांना वाचवण्यासाठी टॅंकरमध्ये चढले. मात्र, विषारी वायूमुळे ते सर्व बेशुद्ध पडले. यानंतर आणखी एकजण खाली उतरला. त्यालाही श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. म्हणून ते देखील आरडाओरड करू लागले. यानंतर सर्व मजुरांना बाहेर काढून जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. उपचारादरम्यान सातव्या मजुराचा मृत्यू झाला.

10 दिवसांपूर्वीच लागले होते कामाला

मृतांमध्ये एम. रमेश (32), जी. गोविंदा स्वामी (35), बी. रामचंद्र (23), ए. रेडप्पा (30), आर. बाबू (30), अय्यम रेड्डी पल्लेक केशव (20) आणि बी. व्यंकट राजुलू (23) यांचा समावेश आहे. मृतांमधील पाचजण अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील पडेरूचे आहेत. तर दोघे मंडळातील पुलीमेरू गावातील आहेत. हे सर्वजण 10 दिवसांपूर्वी नोकरीवर रुजू झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तेल कारखान्याची फॅक्टरीज अ‌ॅक्टनुसार नोंदणी झालेली नाही. विषारी वायूमुळे हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत मिळणार

जिल्हा अग्निशमन अधिकारी व्ही. श्रीनिवास रेड्डी म्हणाले की, हॅचरीला अग्निशमन विभागाची एनओसी नव्हती. पोलिसांनी कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे, तर कंपनीने 15 लाख रुपये एक्स-ग्रेशिया देण्याचे मान्य केले आहे.

Web Title: 7 workers killed while cleaning oil factory export tanker incident in mp kakinada district nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2023 | 03:29 PM

Topics:  

  • Oil tanker

संबंधित बातम्या

Beed Tanker Blast: ‘आगीच्या प्रचंड ज्वाला, धुराचे लोट अन्…’, मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा भीषण स्फोट; धक्कादायक Video व्हायरल
1

Beed Tanker Blast: ‘आगीच्या प्रचंड ज्वाला, धुराचे लोट अन्…’, मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा भीषण स्फोट; धक्कादायक Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.