Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तामिळनाडूत ट्रेनमध्ये बेकायदेशीरपणे घेऊन जात होते सिलिंडर, आग लागल्याने 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी!

एका पॅसेंजर ट्रेनला आग लागली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. प्रवाशांच्या डब्यात बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर आणले होते, त्यामुळे आग लागली, अशी माहिती समोर आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 26, 2023 | 10:24 AM
तामिळनाडूत ट्रेनमध्ये बेकायदेशीरपणे घेऊन जात होते सिलिंडर, आग लागल्याने 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी!
Follow Us
Close
Follow Us:

तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पॅसेंजर ट्रेनला आग (Tamilnadu Train Fire) लागून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. प्रवाशांनी डब्यात गॅस सिलिंडर बेकायदेशीरपणे आणले होते, त्याचा स्फोट झाल्याने ही आग लागली. यामुळे काही प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागला.

[read_also content=”23 ऑगस्ट ‘नॅशनल स्पेस डे’ साजरा होणार, विक्रम लँडर उतरले त्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव; चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचलं त्याला ‘तिरंगा’ नावाने ओळखणार, पंतप्रधानांकडून घोषणा https://www.navarashtra.com/india/august-twenty-three-national-space-day-will-be-celebrated-the-place-where-vikram-lander-landed-will-be-named-shiva-shakti-announced-by-the-pm-449747.html”]

नेमकं काय घडलं

दक्षिण रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मदुराई रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनला ही भीषण आग लागली. कोचीवरुन तामिळनाडुच्या दिशेनं जाणाऱ्या  “पुनालुर-मदुराई एक्स्प्रेसला आज पहाटे 5:15 वाजता मदुराई यार्ड येथे आग लागली. यावेळी अग्निशमन दलाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली. इतर डब्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, यामध्ये आठ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

प्रवाशांनी बेकायदेशीरपणे ट्रेनमध्ये आणले गॅस सिलिंडर

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १६७३० (मदुराई-पुनालुर एक्सप्रेस) मध्ये लखनौहून 65 प्रवाशांना घेऊन एक खासगी पार्टी ट्रेनच्या टुरिस्ट कोचमध्ये चढली. आज पहाटे ३.४७ वाजता मदुराईला पोहोचली. यावेळी ट्रेनमधील काही प्रवाशांनी एलपीजी सिलिंडर सोबत आणले होते. सकाळच्या सुमारास त्यांनी चहा/नाश्ता तयार करण्यासाठी सिलिंडरचा वापर सुरू केला. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन कोचला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच बहुतांश प्रवासी डब्यातून बाहेर पडले. त्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच,  मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवण्यात आली. या घटनेवर दु:ख व्यक्त करण्यात येत असून दक्षिण रेल्वेने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, मृतांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल.

आगीचा व्हिडिओही आला समोर

या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून ज्यामध्ये डब्याला भीषण आग लागल्याचे आणि काही लोक आजूबाजूला ओरडत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान शेजारील रेल्वे रुळावरून एक ट्रेनही जात आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यादरम्यान ट्रेनचा डबा जळालेला दिसत आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही लोकांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर घेतले होते, त्यामुळे आग लागली. रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वे डब्यात कोणतीही ज्वलनशील सामग्री घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. ज्या डब्यात आग लागली तो खासगी कोच होती.

Web Title: 8 passenger died in fire at running train in tamilnadu nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2023 | 10:10 AM

Topics:  

  • burning train
  • Tamil Nadu

संबंधित बातम्या

भाजपला दक्षिणेत धक्का, या पक्षाने सोडली  NDA ची साथ, राजकीय समीकरणं बदलणार
1

भाजपला दक्षिणेत धक्का, या पक्षाने सोडली NDA ची साथ, राजकीय समीकरणं बदलणार

लक्झरी लाईफसाठी लक्झरी कारची चोरी; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या MBA मुलाचा २० वर्षांचा ‘कार’नामा, एकदा वाचाच
2

लक्झरी लाईफसाठी लक्झरी कारची चोरी; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या MBA मुलाचा २० वर्षांचा ‘कार’नामा, एकदा वाचाच

भाजल्यानंतर हातांवर पडलेले डाग एका रात्रीतच करा दूर; डॉक्टरांनी सांगितला आयुर्वेदिक उपाय
3

भाजल्यानंतर हातांवर पडलेले डाग एका रात्रीतच करा दूर; डॉक्टरांनी सांगितला आयुर्वेदिक उपाय

Amit Shah : “मी राहतो दिल्लीत, पण कान तमिळनाडूत” ; अमित शाहांचा DMK वर हल्लाबोल
4

Amit Shah : “मी राहतो दिल्लीत, पण कान तमिळनाडूत” ; अमित शाहांचा DMK वर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.