Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अत्याचार पीडित महिलांना आता लवकर न्याय मिळणार; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवीन न्यायालयांमुळे बलात्कार आणि बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. विशेषतः महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 05, 2026 | 08:08 AM
आता महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण लवकरच लागणार मार्गी; देशभरात 850 नवीन फास्टट्रॅक कोर्ट केले जाणार स्थापन

आता महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण लवकरच लागणार मार्गी; देशभरात 850 नवीन फास्टट्रॅक कोर्ट केले जाणार स्थापन

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारचा महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय.
  • देशभरात ८५० फास्टट्रॅक न्यायालयांच्या विस्ताराला मंजुरी.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक

नवी दिल्ली : महिला आणि बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये न्यायप्रक्रिया गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरातील ८५० जलदगती (फास्टट्रॅक) न्यायालयांच्या विस्ताराला आणि बळकटीकरणाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

बलात्कार आणि बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणांचा जलद निपटारा करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. या विशेष न्यायालयांमध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत प्रकरणांचीही सुनावणी होते. विशेष न्यायालयांचा विस्तार झाल्याने प्रलंबित खटल्यांचा निपटारा वेगाने होईल आणि पीडितांना वेळेत न्याय मिळण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे. कायदा व न्याय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ३० एप्रिल २०२६ पर्यंत देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ७७५ जलदगती विशेष न्यायालये कार्यरत होती.

दरम्यान, कायदा व न्याय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ७७५ जलदगती विशेष न्यायालये कार्यरत होती. आता या न्यायालयांच्या विस्ताराला आणि बळकटीकरणाला मंजुरी मिळाल्याने न्यायव्यवस्थेची क्षमता वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. नवीन न्यायालयांमुळे बलात्कार आणि बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. विशेषतः महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

FAQ

१. केंद्र सरकारने कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे?

देशभरात ८५० फास्टट्रॅक विशेष न्यायालयांच्या विस्ताराला आणि बळकटीकरणाला मंजुरी दिली आहे.

२. या निर्णयाचा मुख्य उद्देश काय आहे?

महिला आणि बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांचा जलद निपटारा करून पीडितांना वेळेत न्याय मिळवून देणे.

३. या न्यायालयांमध्ये कोणत्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे?

बलात्कार, महिला अत्याचार आणि बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणांची सुनावणी होणार आहे.

Web Title: 850 new fast track courts are to be set up across the country nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 08:08 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.