पाटणा : बिहारमधील बांका येथील एका घटनेने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. बंका येथून जावई आणि सासू यांच्यातील एक अनोखे प्रेमप्रकरण (Patna Love Affair) समोर आले आहे. आपल्या पत्नी आणि जावयाचे प्रेम प्रकरण कळता सासऱ्याने त्या दोघांचे लग्न लावून दिले. यातील आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांनीही गर्दीसमोर एकमेकांचे प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले. त्यानंतर जावयाने जमावासमोर सासूला कुंकू लावले, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
बिहार, में सास-दामाद ने गांव वालों के सामने रचाई शादी, दामाद और सास का कई सालों से चल रहा था अफेयर, अब यही देखना रह गया था #AbkiBaar400Paar #Election2024 #GTvsRCB #TakeItLightly #viralvideo #LokSabhaPolls #TejRanFam #INFOSYS pic.twitter.com/YGKl7P8pQj
— Priya halchal (@HalchalPriya) April 28, 2024
छत्रपाल पंचायतीच्या हीर मोती गावामध्ये घडलेली ही घटना संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. सिकंदरचे लग्न झाले होते. त्याला दोन मुले झाली. पण काही काळानंतर त्याची पत्नी मरण पावली. यानंतर त्याने दुसरे लग्न केले. पण त्याचे दुसऱ्या पत्नीसोबतचे संबंध चांगले चालले नाहीत आणि दोघेही वेगळे झाले. मात्र, सिकंदर पहिल्या पत्नीच्या घरी येत-जात होता. सिकंदरचे सासूशी चांगले बोलणे होते. त्यांच्या संवादाचे रुपांतर प्रेमात कधी झाले. दोघांमध्ये प्रेम फुलले तेव्हा सासरच्या मंडळींना संशय आला. मात्र, सासरे दिलेश्वर यांनी दोघांच्या संमतीनेच लग्न लावून देण्याचे मान्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलेश्वरने काही लोकांसोबत त्यांच्या संबंधांवर चर्चा केली आणि सिकंदरही आपल्या सासूला पत्नी म्हणून स्वीकारण्यास तयार झाला. आधी सिकंदरने सासूला समाजासमोर कुंकू लावले आणि नंतर न्यायालयात जाऊन लग्न केले आणि अशाप्रकारे सासू-जावई पत्नी-पत्नी बनले.