Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत्या कारमध्येच महिला पोलिसाला हृदयविकाराचा झटका आला अन् नंतर…

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तैनात असलेल्या महिला पोलिस प्रतिभा त्रिपाठी यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रतिभा वैद्यकीय तपासणीनंतर इंदूरहून भोपाळला परतत असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे, धावत्या कारमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2024 | 01:16 PM
धावत्या कारमध्येच महिला पोलिसाला हृदयविकाराचा झटका आला अन् नंतर…
Follow Us
Close
Follow Us:

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तैनात असलेल्या महिला पोलिस प्रतिभा त्रिपाठी (Pratibha Tripathi) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रतिभा त्रिपाठी या वैद्यकीय तपासणीनंतर इंदूरहून भोपाळला परतत असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे, धावत्या कारमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भोपाळमधील महिला कक्षात तैनात असलेल्या पोलिस निरीक्षक प्रतिभा त्रिपाठी बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. 2020 मध्ये कोव्हिडच्या पहिल्या लाटेत कोरोनाचा त्यांना संसर्ग झाला होता. प्रतिभा यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली. पण त्या कोव्हिडनंतर सतत आजारी पडायच्या. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रासही होता, ज्यामुळे सातत्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. कोरोना काळात त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यानंतर त्या वैद्यकीय रजेवर होत्या.

ऑक्टोबर 2023 मध्येच त्या पुन्हा नोकरीवर रुजू झाल्या. अशातच शनिवारी पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना इंदूरला नेण्यात आले. तिथे वैद्यकीय तपासणीनंतर पती आणि मुलासह इंदूरहून भोपाळला परतत असताना सोनकच्छजवळ त्यांची प्रकृती खालावली. पतीने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी प्रतिभा यांना मृत घोषित केले.

Web Title: A woman police suffered a heart attack in a moving car incident in bhopal mp nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 01:16 PM

Topics:  

  • bhopal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.