फक्त ३ तासांसाठी ED,CBI द्या, सर्वांना जेलमध्ये टाकतो! संजय सिंह राज्यसभेत कडाडले
संसदेचं हिवाळी अधिवशन सुरू असून राज्यसभेत मंगळवारी आपचे खासदार संजय सिहं यांच्या विधानाने जोरदार गदारोळ झाला. भाजपवाले भ्रष्टाचारावर बोलतात त्यावेळी असं वाटतं की ओसाम बीन लादेन बोलत आहे. ज्या दिवशी सत्तापरिवर्तन होईल, त्या दिवशी एकही माणूस सोडला जाणार नाही. ईडी-सीबीआयला तीन तास द्या, मी सर्वांना तुरुंगात पाठवतो, असं म्हणत संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
संजय सिंह म्हणाले की, दिल्लीच्या निवडणुकीसाठी येत असाल तर शांतपणे या. इथे खालच्या पातळीवरचं राजकारण आणि हिंदू-मुस्लीम चालणार नाही, कारण दिल्लीच्या जनतेला आम्ही सुशिक्षित बनवलं आहे. आम्ही दिल्लीतील लोकांना शिकवले आहे की येथे घाणेरडे राजकारण केले गेले आणि हिंदू-मुस्लिम विभागले गेले. ते म्हणतील शाळा-हॉस्पिटल. येथे हुकूमशाही आणि गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. तीन वेळा निवडणुकीत पराभव झाला आहे, म्हणून मतदार याद्या बदलण्याचा घाट घातल जात आहे. हे चालणार नाही, हा देश कोणाच्या आदेशाने नव्हे तर बाबासाहेबांच्या राज्यघटनेने चालेल. इथे इंडिया आघाडी आहे, तिथे ईडीची आघाडी असल्याचा घणाघात त्यांनी केला.
दिल्ली निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून नावे हटवल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुघलकाबाद बूथवरील मोठ्या संख्येने मतदारांची नावे हटवली आहेत. संजय सिंह यांच्या या आरोपावर उपसभापती हरिवंश यांनी ते पुराव्यास सिद्ध करण्यास सांगितलं. त्यावर सिद्ध करणास असल्याचं संजय सिंह यांनी सांगितले. यावर सभागृह नेते जेपी नड्डा म्हणाले की, संजय सिंह यांनी उपस्थित केलेला मुद्दा, नावे हटवण्याची तरतूदही त्याच घटनेत आहे ज्यावर आपण चर्चा करत आहोत.
1971 War : पाकिस्तानच्या ९०००० सैनिकांची शरणागती; १९७१ च्या विजयाचा तो ऐतिहासिक फोटो हटवला
आमच्या नेत्यावर कमेंट केल्या जात आहेत, तुम्ही त्यांना थांबवलं नाही. त्यांना समजले आहे की विरोधी लोक त्यांना घाबरतील आणि गप्प बसतील. त्यामुळे आम्ही ज्यावेळी बोलतो त्यावेळी ते गोंधळ घालतात. या गदारोळावर संजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टिप्पणीही काढून टाकली पाहिजे, असा आग्रह धरला. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे? संजय सिंह म्हणाले की, ते देशात भारत खोदो योजना चालवत आहेत. कधीतरी कोणीतरी येईल आणि म्हणेल संसद खोदून टाका. शिक्षणाचा संदर्भ देत त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आणि सांगितले की, शिक्षण विभागाने सभागृहात दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आठ महिन्यांत 11 लाख मुले सरकारी शाळांपासून दूर गेली असून त्यापैकी 7 लाख 84 हजार मुले एकट्या उत्तर प्रदेशमधून असल्याची त्यांनी माहिती दिली.