पाकिस्तानच्या ९०००० सैनिकांची शरणागती; १९७१ च्या विजयाचा तो ऐतिहासिक फोटो हटवला
1971 मध्ये पाकिस्तान सोबतच्या युद्धात भारताने मोठा विजय मिळवला होता. युध्दानंतर पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्करली होती. त्यावेळी झालेल्या समझोत्यावर स्वाक्षरी करतानाचा एक ऐतिहासिक फोटो आहे. सैन्यदलाच्या मुख्यालयात हा फोटो आठवण म्हणून लावण्यात आला होता. युध्दाप्रमाणेच त्यावेळचा एक फोटोही ऐतिहासिक ठरला होता. मात्र आता या फोटोवरून नवा वाद उफाळून आला आहे. आज संसदेत त्याचे पडसाद उमटले.
मात्र लष्कराच्या मुख्यालयातून हटवण्यात आलेल्या फोटोबाबत सरकारकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. अलिकडेच हा फोटो हटवण्यात आल्याचं समोर आले आहे. त्यावर कॉंग्रेसच्या वायनाडच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधींनी सोमवारी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. पण अद्याप संरक्षण मंत्रालयाकडूनही यावरण कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. भारत आणि बांग्लादेशातील स्थिती सध्या बिघडलेली आहे. या पार्श्वभूमीवर हा फोटो हटवण्यात आल्याचं समोर आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आज संसद के शून्य काल में अपनी बात रखी-
बांग्लादेश में हिंदुओं और ईसाई अल्पसंख्यकों पर हो जो अत्याचार हो रहा है, उसके खिलाफ सरकार को ठोस कदम उठाने चाहिए।
दुख की बात है कि सेना के हेडक्वार्टर में से वह तस्वीर हटा दी गई है जिसमें पाकिस्तान की सेना भारतीय सेना के सामने आत्मसमर्पण… pic.twitter.com/BVTeniU289
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 16, 2024
1971 च्या ऐतिहासिक विजयाची आठवण म्हणून हा फोटो दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात अनेक वर्षांपासून लावण्यात आला होता. आता हा फोटो काढून त्याजागी दूसरा फोटो लावण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी सोमवारी लोकसभेत नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाल्या प्रियांका गांधी?
पाकिस्तानचे सैन्य भारतीय सैन्यसमोर आत्मसमर्पण करत असलेला फोटो सैन्यदलाच्या मुख्यालयातून हटवण्यात आला आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. १९७१ च्या युद्धातील तो फोटो भारताच्या नेतृत्वाचा आणि सैन्याने गाजवलेल्या अद्वितीय पराक्रमाचा ऐतिहासिक फोटो आहे. हा फोटो पूर्वीच्या जागी लावला जावा, अशी मागणी प्रियांका गांधींनी केली आहे.
पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशवर आक्रमण केलं होतं. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबत युद्ध पुकारलं, 1971 मध्ये 3 डिसेंबर रोजी सुरू झालेले हे युद्ध 16 डिसेंबर रोजी संपले होते. पाकिस्तानच्या 90 हजार सैन्याने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती. पाकिस्तानचे तत्कालीन पूर्व विभाग प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. ए. के. नियाझी यांनी भारतीय लष्कराचे तत्कालीन पूर्व विभाग प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यासमोर शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. ही सही करणाचा फोटो ऐतिहासिक ठरला होता.