बिहार विधानसभा निवडणुकीस अवघे काही महिने उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
लुधियाना वेस्ट विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा पंजाबात भारतीय जनता पक्षासाठी जुनाच ट्रेंड समोर आला आहे. पक्षाला लक्षणीय मतं मिळत असली तरी या मतांचं जागांमध्ये किंना विजयात रुपांतर होताना…
आपने लुधियाना पश्चिम जागेवर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना तिकीट देण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीत भाजपाची २७ वर्षांनंतर सत्ता आली आहे. विधानसभा निवडणुकीत ४८ जागा मिळवत दिल्ली काबीज केली आहे. त्यानंतर तीन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. मात्र अधिवेशनातला मंगळवार अत्यंत वादळी ठरला…
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आपचं राजकीय भविष्य धोक्यात असल्याचं सांगितलं जात असतानाच आपच्या पंजाब सरकारबद्दल वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मद्य धोरणातून केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात जावं लागलं. दिल्लीतील पराभवामागे हे धोरण मुख्य कारण सांगितलं जात असताना आता मनी लाँड्रिंग प्रकरणा आणखी एक आपचा नेता अडचणीत आला आहे.
दिल्लीच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पंजाब सरकारमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलच्या निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. या अंदाजांनी गेली १० वर्ष सत्तेत असलेल्या आपचं टेन्शन वाढलं आहे.
दिल्ली विधानसभा निडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे. त्याआधी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांचे पीए पंकज यांना गिरीखंडनगरमध्ये १५ लाख रुपयांच्या रकमेसह अटक करण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ला ५५ जागा मिळत आहेत. मात्र जर माता आणि भगिनींनी कठोर परिश्रम केले तर पक्षाला ६० पेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मदानाला ५ दिवस शिल्लक असताना आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या ७ आमदारांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा आहेत ज्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला एकूण ३६ आमदारांची आवश्यकता असेल. सध्या दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. अशा…
भाजप नेते रमेश बिधुरी यांनी कॉंग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर वादंग उठलं असतानाच आज पुन्हा त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द काढले. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
दिल्ली निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी कॅगचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर राजधानी दिल्लीचं राजकारण चांगलंच तापलं आहे. केजरीवाल यांच्या निवास्थानाच्या नुतनीकरणाचा खर्च तब्बल ३३.६६ कोटींवर गेल्याचं म्हटलं आहे.
ज्या दिवशी सत्तापरिवर्तन होईल, त्या दिवशी एकही माणूस सोडला जाणार नाही. ईडी-सीबीआयला तीन तास द्या, मी सर्वांना तुरुंगात पाठवतो, असं म्हणत संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापू लागलं असून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने सर्व ७० जागांवर उमेदवार उतरवले आहेत. ३८ उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली.
देशात सध्या निवडणुकीत महिला मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र, झारखंडनंतर दिल्लीच्या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाली आहे.
दिल्लीच्या निवडणुकांमध्ये गेमचेंजर मानल्या गेलेल्या रिक्षा चालकांना केजरीवाल यांनी मोठ्या गॅरंटी दिल्या आहेत. त्यामुळे यावेळीही रिक्षा चालक गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.