AAP's Sanjay Singh demands posthumous Bharat Ratna award for Dr. Manmohan Singh
दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डय मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी पूर्ण एक दशक कार्यभार सांभाळला होता. मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी घेतलेले अनेक निर्णय देशाच्या हिताचे ठरले. त्यांनी देशासाठी दिलेल्या सेवेचे आज जगभरातून कौतुक केले जात आहे. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने अर्थविषयक सरदार गमावला असल्याची भावना नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. आता डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे.
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच महत्त्वपूर्ण मागणी देखील केली आहे. संजय सिंह म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले, ते भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नचे पात्र आहेत. भारताच्या प्रगतीसाठी 10 वर्षे काम करणाऱ्या महान अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधानांचे निधन ही निश्चितच दुःखद बातमी आणि मोठे नुकसान आहे. पक्षाच्या वतीने मी शोक व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो.” अशा शब्दांत आप नेते संजय सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच आप नेते संजय सिंह यांनी मनमोहन सिंग यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग काळाच्या पडद्याआड; 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशामध्ये शोककळा पसरली आहे. सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. शोक व्यक्त करताना आतिशी म्हणाले की, देशाने केवळ एक नामवंत अर्थज्तज्ञ गमावला नाही तर एक असा नेता गमावला आहे ज्यांचे शहाणपण आणि प्रतिष्ठा नेहमीच स्मरणात राहील. कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती हार्दिक संवेदना. या कठीण काळात ईश्वर त्यांना शक्ती देवो, अशा भावना अतिशी मार्लेना यांनी व्यक्त केल्या आहेत.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जीवनप्रवास जाणून घ्या एका क्लिकवर
आपचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील डॉ. मनमोहन सिंग यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन अरविंद केजरीवाल यांनी लिहिले आहे की, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ही देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या विद्वत्ता आणि साधेपणाचे गुण शब्दात मांडणे अशक्य आहे. त्या पुण्यवान आत्म्यास ईश्वर चरणी स्थान देवो. त्यांच्या कुटुंबीयांना आणि हितचिंतकांना माझ्या संवेदना. ओम शांती, अशा भावना अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केल्या आहेत.
भारत के पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी का निधन देश के लिए एक अपूरणीय क्षति है। उनकी विद्वता और सादगी के गुणों को शब्दों में पिरोना असंभव है। ईश्वर पुण्यात्मा को अपने श्री चरणों में स्थान दें। उनके परिवार और शुभचिंतकों के प्रति मेरी संवेदनाएं।
ॐ शांति— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 26, 2024