Bareilly Road Accident
बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. यात ट्रॅक्टर-ट्रॉलीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस झाडावर आदळली. या अपघातात 36 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली जात आहे. हा अपघात शनिवारी झाला.
लखीमपूर खेरी येथील लोक एका सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खासगी बसने शामली येथे गेले होते आणि बरेलीमार्गे लखीमपूर खेरी येथे परतत असताना कमुआ गावाजवळ हा अपघात झाला. या बसमध्ये सुमारे 50 भाविक होते. लाकडांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली बिसलपूरच्या दिशेने येत असताना तिला वाचवण्याच्या प्रयत्नात बस झाडावर आदळली.
ही बस झाडावर आदळल्याने बसचे मोठे नुकसान झाले असून, त्यात 36 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्व जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.