चंद्र मोहिमेच्या (Chandrayaan -3) यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी, सूर्य मिशन (Aditya-L1 Mission)हाती घेतलं आहे. या संदर्भात इस्रोकडून मिळालेल्या अपडेट नुसार, 2 सप्टेंबर रोजी (Aditya L1 Solar Mission Launch Date) या सूर्य मोहिमेच्या प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ‘आदित्य-L1’ अंतराळयानाला सूर्याच्या सर्वात बाहेरील थराच्या निरीक्षणासाठी आणि सौर वाऱ्याचे निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केलेलं आहे.
[read_also content=”तामिळनाडूत ट्रेनमध्ये बेकायदेशीरपणे घेऊन जात होते सिलिंडर, आग लागल्याने 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी! https://www.navarashtra.com/india/8-passenger-died-in-fire-at-running-train-in-tamilnadu-nrps-449786.html”]
सूर्याचे निरीक्षण करणारी पहिली समर्पित भारतीय अंतराळ मोहीम ASEL ISRO द्वारे प्रक्षेपित केली जाईल. आदित्य-L1 मोहिमेचा उद्देश एल-1 भोवतीच्या कक्षेतून सूर्याचे निरीक्षण करणे आहे. ADITYA-L1 मध्ये एकूण सात वेगवेगळे पेलोड असतील. जे सूर्याकडून येणाऱ्या किरणांचे परीक्षण करणार. यामध्ये हाय डेफिनेशन कॅमेरेही असतील. चार पेलोड्स सूर्याचे रिमोट सेन्सिंग करतील आणि उर्वरित तीन इन-सीटू निरीक्षणासाठी वापरल्या जातील.
आदित्य-L1 अल्ट्राव्हायोलेट पेलोड वापरून आणि एक्स-रे पेलोड वापरून फ्लेअर्सचे निरीक्षण करून कोरोना आणि सौर क्रोमोस्फियरची माहिती देऊ शकते. पार्टिकल डिटेक्टर आणि मॅग्नेटोमीटर पेलोड चार्ज केलेले कण आणि L-1 च्या आसपासच्या बाह्य कक्षेत पोहोचणारे चुंबकीय क्षेत्र याबद्दल माहिती देऊ शकतात.
इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आदित्य-एल1 हा राष्ट्रीय संस्थांच्या भागीदारीतील एक पूर्णपणे स्वदेशी प्रयत्न आहे. बंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA) ही दृश्यमान उत्सर्जन रेषा कोरोनग्राफ पेलोडच्या निर्मितीसाठी प्रमुख संस्था आहे. इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स, पुणे यांनी या मोहिमेसाठी सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजर पेलोड विकसित केले आहे.