Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अर्णब’नंतर आता पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट; वातावरण बदलणार, जोरदार पाऊस होणार

अल्लुरी सीताराम राजू, पोलावरम आणि एलुरू जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विजयनगरम, एनटीआर, पलनाडू, मार्कापुरम, प्रकाशम, नेल्लोर, तिरुपती, चित्तूर आणि अन्नमय्या जिल्ह्यांतील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 03, 2026 | 09:32 AM
'अर्णब'नंतर आता पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट; वातावरण बदलणार, जोरदार पाऊस होणार

'अर्णब'नंतर आता पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट; वातावरण बदलणार, जोरदार पाऊस होणार

Follow Us
Follow Us:
  • अर्णब’ चक्रीवादळानंतर आता ‘मुरासू’ चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे.
  • बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळाची निर्मिती होत असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
  • हे वादळ हळूहळू वायव्य दिशेने सरकत आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरण्याआधीच आता ‘मुरासू’ चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले हे चक्रीवादळ हळूहळू वायव्य दिशेकडे सरकत आहे. यामुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मुरासू’ चक्रीवादळ सोमवार, २ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या दरम्यान जोरदार वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस पडेल. गेल्या सहा तासांत हे वादळ ताशी सुमारे २७ किमी वेगाने पुढे सरकत आहे. सध्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात असलेले हे तीव्र चक्रीवादळ चेन्नईपासून ४८० किमी, नेल्लोरपासून ५५० किमी, मछलीपट्टणमपासून ५६० किमी, ऑगोलपासून ६०० किमी आणि विशाखापट्टणमपासून ६१० किमी अंतरावर आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारी सकाळपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात हे वादळ अधिक तीव होईल. त्यानंतर वायव्य दिशेकडे प्रवास करत सोमवारच्या मध्यरात्री ते मंगळवार सकाळच्या दरम्यान हे वादळ नेल्लोर आणि नरसपूरच्या दरम्यान किनारपट्टी ओलांडेल.

वाऱ्याचा वेग ताशी 120 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता

किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी असू शकतो, तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी १२० किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नेल्लोर आणि नरसपूर दरम्यान किनारपट्टी ओलांडल्यानंतर याचा फटका आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील अनेक जिल्ह्यांना बसेल. त्यानंतर हे वादळ हैदराबाद, वारंगल आणि करीमनगरमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. मंगळवार सकाळपर्यंत हे वादळ अधिक तीव्र होईल आणि ४ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत हळूहळू कमकुवत होईल.

जोरदार वारे वाहण्याची शक्यता

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरील प्रदेशांत आणि रायलसीमा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांत मुसळधार पावसाचाही अंदाज आहे. सोमवार दुपारपासून किनारपट्टीच्या भागात ८० ते ९० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

चित्तूर जिल्ह्यांतील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

एलुरू, पश्चिम गोदावरी, पूर्व गोदावरी, एनटीआर, पलनाडू, तिरुपती आणि चित्तूर जिल्ह्यांतील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त अल्लुरी सीताराम राजू, पोलावरम, काकीनाडा, डॉ. बी. आर. आंबेडकर कोनासीमा, नंदियाल, वायएसआर कडपा आणि अन्नमय्या जिल्ह्यांच्या काही भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मंगळवारी अल्लुरी सीताराम राजू, पोलावरम आणि एलुरू जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विजयनगरम, एनटीआर, पलनाडू, मार्कापुरम, प्रकाशम, नेल्लोर, तिरुपती, चित्तूर आणि अन्नमय्या जिल्ह्यांतील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

FAQ

प्र.1. ‘अर्णब’नंतर कोणत्या चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे?

उत्तर: ‘मुरासू’ या चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे.

प्र.2. ‘मुरासू’ चक्रीवादळाची निर्मिती कुठे होत आहे?

उत्तर: बंगालच्या उपसागरात या चक्रीवादळाची निर्मिती होत असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

प्र.3. हे चक्रीवादळ कोणत्या दिशेने सरकत आहे?

उत्तर: हे चक्रीवादळ वायव्य दिशेने सरकत आहे.

Web Title: After arnab another cyclonic storm looms weather conditions are set to change nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 09:32 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.