हैद्राबाद: हैद्राबादमध्ये एअर इंडिया एक्सप्रेच्या फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हैद्राबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनलवर ही घटना घडली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे हैद्राबादवरुन थायलंडला जाणारे विमान रद्द करण्यात आले आहे. थायलंडला जाण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईटने उड्डाण भरले होते. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे फ्लाईट पुन्हा हैद्राबाद एअरपोर्टवर लँड करण्यात आले.
हैद्राबाद ते थायलंड या एअर इंडिया एक्सप्रेसच्य फ्लाईटचे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सकाळी ६.४० वाजता फ्लाईटने थायलंडमधील फुकेतला जाण्यासाठी उड्डाण केले होते. निर्धारित वेळेपेक्षा फ्लाईट २० मिनिटे उशिरा होती. मात्र उड्डाण करताच काही वेळाने तांत्रिक बिघाड झाल्याने फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
हैद्राबाद वरून निघालेले विमान फुकेतला ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचणे अपेक्षित होते. मात्र उड्डाण केल्यावर पायलटला फ्लाईटमध्ये काहीशी अडचण जाणवल्याने त्याने विमान पुन्हा हैद्राबाद एअरपोर्टवर लँड केले. या फ्लाईटमधून किती प्रवासी प्रवास करत होते, व फ्लाईटमध्ये नेमका काय बिघाड झाला, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
Indigo ला इमर्जन्सी लँडिंगचे ग्रहण!
इंडिगोची फ्लाईट 6E 6271 चे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. पायलटची सावधानता आणि योग्य निर्णय यामुळे १९१ प्रवाशांचा जीव वाचला आहे. पायलटने पॅन..पॅन..पॅन असा कॉल दिला. जो एक इमर्जन्सी सिग्नल असतो. त्यानंतर फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
एअर इंडियाच्या विमानाच्या भयानक अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. उड्डाण होताच विमान कोसळले, ज्यामध्ये २६० लोकांचा मृत्यू झाला. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, उड्डाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद पडले. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. याचा अर्थ असा की दोन्ही इंजिन टेकऑफच्या काही सेकंदातच बंद पडले, अशी धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली.
पॅन..पॅन..पॅन चा काय आहे अर्थ?
पॅन..पॅन..पॅन हा एक प्रकारचा इमर्जन्सी सिग्नल असतो. जो विमानाच्या उड्डाण झाल्यावर काही इमर्जन्सी असल्यास वापरला जातो. हा सिंगल दिल्यास फ्लाईटमध्ये काहीतरी अडचण असल्याचे समजले जाते. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करणेच योग्य ठरते. त्यामुळे दिली ते गोवा या इंडिगोच्या फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. पायलटच्या सावधनतेमुळे १९१ प्रवासी सुखरूप असून, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानात नेमका काय बिघाड झाला आहे याचा तपास केला जात आहे.