Air India increased the check-in luggage limit from 20 kg to 30 kg
मुंबई : विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या बॅगेज पॉलिसीमध्ये मोठा बदल करत प्रवाशांना अतिरिक्त सामान नेण्याची मुभा दिली आहे. या नव्या नियमांनुसार, प्रवाशांना 7 किलो केबिन बॅगेजसह आता 30 किलोपर्यंत चेक-इन बॅगेज नेण्याची परवानगी मिळणार आहे. याआधी ही मर्यादा 20 किलो होती. त्यामुळे प्रवाशांना आता 10 किलो अतिरिक्त सामान घेऊन जाण्याची सुविधा मिळणार आहे.
बॅगेज धोरणात महत्त्वाचे बदल
एअर इंडियाच्या नव्या नियमांनुसार, प्रवाशांना 30 किलोपर्यंतचे चेक-इन बॅगेज नेण्याची संधी देण्यात आली आहे. याशिवाय, दोन केबिन बॅगेज नेण्याचीही मुभा असेल. मात्र, दोन्ही पिशव्यांचे एकूण वजन 7 किलोच्या मर्यादेत असावे. यात लॅपटॉप बॅग, हँडबॅग, बॅकपॅक किंवा लहान आकाराच्या बॅग समाविष्ट असतील. एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, केबिन बॅगेजचा आकार 40 सेमी x 30 सेमी x 10 सेमी पेक्षा जास्त नसावा. या नियमामुळे बॅगेज प्रवासादरम्यान समोरच्या सीटखाली व्यवस्थित ठेवता येईल. विमान प्रवास अधिक आरामदायक करण्याच्या दृष्टीने एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nostradamus Prediction : नॉस्ट्राडेमसची ‘ही’ भविष्यवाणी आहे आणि पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीशी संबंधित
मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना विशेष सवलत
लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी एअर इंडिया एक्सप्रेसने विशेष सुविधा जाहीर केली आहे. अशा कुटुंबांना 40 किलो चेक-इन बॅगेज आणि 7 किलो केबिन बॅगेजसह एकूण 47 किलो वजन नेण्याची परवानगी असेल. ही सुविधा कुटुंब प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
सर्व फ्लाइट्सवर सुविधा लागू नाही
नव्या बॅगेज पॉलिसीचा लाभ घेण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी ही सुविधा एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्व फ्लाइट्ससाठी लागू नाही. एअर इंडियाच्या अधिकृत घोषणेनुसार, ही सुविधा केवळ भारत, मध्य पूर्व आणि सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठीच लागू असेल. इतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील फ्लाइट्ससाठी जुनाच नियम लागू राहणार आहे. त्यामुळे इतर फ्लाइट्समध्ये प्रवाशांना केवळ 20 किलो चेक-इन बॅगेज आणि 7 किलो केबिन बॅगेज नेण्याची मुभा असेल.
प्रवाशांसाठी दिलासा, पण नियमानुसारच तयारी आवश्यक
बॅगेज पॉलिसीतील या बदलांमुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ज्या प्रवाशांना अधिक सामान न्यायचे असेल, त्यांच्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, कोणतीही गैरसमज नको म्हणून प्रवाशांनी आपली फ्लाइट आणि तिच्या बॅगेज नियमांबाबत एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा विमानतळावर प्रवासापूर्वी चौकशी करून योग्य तयारी करावी.
नव्या नियमांचा प्रवाशांना फायदा
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानला बालाकोट एअर स्ट्राईक विसरणे अशक्य; भारताविरोधात पुन्हा अपप्रचार सुरू
एअर इंडियाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय
एअर इंडिया एक्सप्रेसच्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. नव्या धोरणामुळे अधिक सामान नेणाऱ्या प्रवाशांची अडचण दूर होणार आहे. मात्र, प्रत्येक प्रवाशाने आपली फ्लाइट आणि तिच्या नियमांबाबत अधिकृत माहिती घेणे गरजेचे आहे. भविष्यातही एअर इंडिया एक्सप्रेस आपल्या सेवांमध्ये सुधारणा करत प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन सुविधा आणेल, अशी अपेक्षा आहे.