
बंगळुरू : बंगळुरू मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बेंगळुरू येथून अल कायदाच्या (Al-Qaeda) एका दहशतवाद्याला (Terrorist) अटक करण्यात आली आहे. कर्नाटकचा अंतर्गत सुरक्षा विभाग (ISD) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) यांच्या संयुक्त कारवाईनंतर, प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित या संशयित दहशतवाद्याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे. आरिफ असं त्याच नाव असून तो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याची माहिती समोर आली आहे.
[read_also content=”‘विशाल 26 एप्रिलला माझं लग्न आहे, मला पळवून घेऊन जा’! 10 रुपयांच्या नोटवर लिहिलेला मेसेज होतोय व्हायरल https://www.navarashtra.com/photos/someone-wrote-vishal-meri-shadi-26-ko-hai-on-10-rs-not-goes-viral-on-internet-nrps-368950.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ एका आयटी कंपनीत वर्क फ्रॅाम होम करत होता. मार्चमध्ये इराकमार्गे सीरियाला जाण्याचा त्यांचा विचार होता. त्यापुर्वीच त्याला 11 फेब्रुवारीला सकाळी अटक करण्यात आलं. आरिफ आयएसआयएसच्या संपर्कात होता आणि त्याने दहशतवादी संघटनेत सामील होण्याची तयारी केली होती. असा आयएसडीला संशय आहे. तसेच तो आधीच अल कायदाच्या संपर्कात होता.
एनआयएने तपासासाठी त्याचा लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली असून अधिक पुरावे शोधण्यासाठी शहरातील थानिसांद्रा भागातील त्याच्या घराची झडती सुरू आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दहशतवादी संघटना इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली होती. गेल्या 2 वर्षांपासून तो अल कायदाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. काही काळापासून अल कायदाचे दहशतवादी सातत्याने पकडले जात आहेत.
सप्टेंबर 2022 मध्ये, बांगलादेशातील अन्सारुल्ला बांग्ला टीम (ABT) या दहशतवादी गटाशी आणि उपखंडातील अल कायदाशी (AQIS) संबंध असल्याच्या संशयावरून दोन व्यक्तींना आसाममध्ये अटक करण्यात आली होती. मुसादिक हुसेन आणि इक्रामुल इस्लाम यांना मोरीगाव पोलिसांनी अटक केली. इक्रामुल इमाम होते. हे एबीटीच्या मोरीगाव मॉड्यूलचा भाग होते. ऑक्टोबर 2022 मध्ये, उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अल कायदा आणि त्याच्याशी संलग्न जमात-उल-मुजाहिद्दीनशी संबंधित आठ संशयित दहशतवाद्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. लुकमान, गगलहेरी येथील मोहम्मद अलीम, मनोहरपूरचा कारी मुख्तार, देवबंदचा कामील, सर्व सहारनपूर जिल्ह्यातील रहिवासी, शामली जिल्ह्यातील झिंझाना येथील शहजाद आणि हरिद्वार (उत्तराखंड) येथील मुदस्सीर अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. बांगलादेशी नागरिक अली नूर आणि झारखंडमधील नवाजीश अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे.