Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! श्रीकृष्ण जन्मभूमी- ईदगाह प्रकरणात हिंदू पक्षाला मोठा धक्का; हायकोर्टाने फेटाळली ‘ही’ महत्वाची याचिका

श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण आणि शाही ईदगाहच्या वादग्रस्त जमिनीचा वाद सध्या अलाहाबाद हायकोर्टात आहे. या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2025 | 04:35 PM
मोठी बातमी! श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह प्रकरणात हिंदू पक्षाला मोठा धक्का; हायकोर्टाने फेटाळली 'ही' महत्वाची याचिका

मोठी बातमी! श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह प्रकरणात हिंदू पक्षाला मोठा धक्का; हायकोर्टाने फेटाळली 'ही' महत्वाची याचिका

Follow Us
Close
Follow Us:

मथुरा: श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण आणि शाही ईदगाहच्या वादग्रस्त जमिनीचा वाद सध्या अलाहाबाद हायकोर्टात आहे. या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळून लावत मशिदीस वादग्रस्त रचना म्हणण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हिंदू पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने सध्या समोर असलेल्या तथ्यानुसार, शाही इदगाहला वादग्रस्त रचना म्हंटले जाऊ शकत नाही. 5 मार्च 2025 मध्ये हिंदू पक्षाचे प्रतिनिधी महेंद्र प्रताप सिंह यांनी हायकोर्टात ईदगाह मशिदीच्या वास्तूला वादग्रस्त वास्तू घोषित करण्याची मागणी केली होती.  श्रीकृष्णाच्या जन्मभूमीवर एक प्राचीन मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद उभारली गेली असा हिंदू पक्षाचा दावा आहे.

Krishna Janmabhoomi-Shahi Eidgah dispute | Allahabad High Court dismisses a plea that sought to declare Shahi Eidgah Mosque as a "disputed structure".

— ANI (@ANI) July 4, 2025

अलाहाबाद हायकोर्टात या याचिकेवर 23 मे रोजी सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान आज हायकोर्टाने हिंदू पक्षकी ही मागणी फेटाळून लावली आहे.

काय आहे श्रीकृष्ण जन्मभूमी वाद?
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचा वाद अनेक दशके जुना आहे. मथुराचा हा वाद एकूण 13.37 एकर जमिनीच्या मालकीशी संबंधित आहे. 12 ऑक्टोबर 1968 रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने शाही मशीद इदगाह ट्रस्टशी करार केला. या करारात 13.7 एकर जागेवर मंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, श्रीकृष्ण जन्मस्थानकडे 10.9 एकर जमिनीचा मालकी हक्क आहे तर शाही इदगाह मशिदीकडे अडीच एकर जमिनीचा मालकी हक्क आहे. हिंदू बाजूने शाही इदगाह मशिदीचे वर्णन बेकायदेशीरपणे कब्जा करून बांधलेली रचना आहे आणि या जमिनीवर दावाही केला आहे. शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीन श्रीकृष्ण जन्मभूमीला देण्याची मागणी हिंदूंकडून होत आहे. मथुरा दिवाणी न्यायालयात 13.37 एकर जमिनीच्या मालकीची मागणी करणारी याचिका मथुरा न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

इतिहास काय सांगतो?
असा दावा केला जातो की औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केले आणि त्याच ठिकाणी 1669-70 मध्ये शाही ईदगाह मशीद बांधली. यानंतर 1770 मध्ये गोवर्धन येथे मुघल आणि मराठ्यांमध्ये युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांचा विजय झाला. विजयानंतर मराठ्यांनी पुन्हा मंदिर बांधले. 1935 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने बनारसचे राजा कृष्ण दास यांना 13.37 एकर जमीन दिली. 1951 मध्ये श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टने ही जमीन संपादित केली.

Web Title: Alahabad highcourt refuse hindu party petition about mathura shahi masjid illegal structure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Allahabad High Court
  • mathura
  • Shri Krishna

संबंधित बातम्या

Impeachment Motion: आतापर्यंत किती न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्यात आला; ही बातमी एकदा वाचाच
1

Impeachment Motion: आतापर्यंत किती न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्यात आला; ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi : राहुल गांधींना कोर्टाचा दणका! भारतीय सैन्यासंदर्भातील वक्तव्य, समन्सविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली
2

Rahul Gandhi : राहुल गांधींना कोर्टाचा दणका! भारतीय सैन्यासंदर्भातील वक्तव्य, समन्सविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

Mahabharat Katha: कृष्णाने 2 वेळा उघडला होता तिसरा डोळा, झाला होता कहर
3

Mahabharat Katha: कृष्णाने 2 वेळा उघडला होता तिसरा डोळा, झाला होता कहर

स्वपक्षातील नेत्यामुळे ‘हे’ उपमुख्यमंत्री तुरुंगात जाणार? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर…
4

स्वपक्षातील नेत्यामुळे ‘हे’ उपमुख्यमंत्री तुरुंगात जाणार? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.