Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसाचा अमरनाथ यात्रेला फटका; यात्रा दुसऱ्या दिवशीही स्थगित, महामार्ग पडले बंद

काश्मीरमधील अनेक भागात पाऊस (Rain in Kashmir) सुरू असल्याने अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही स्थगित करण्यात आली. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यामुळे यात्रेकरूंच्या कोणत्याही नवीन तुकडीला जम्मूहून पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2023 | 07:16 AM
हिमाचलमध्ये पावसाचा हाहा:कार; ढगफुटी होऊन 52 हून अधिकजण बेपत्ता

हिमाचलमध्ये पावसाचा हाहा:कार; ढगफुटी होऊन 52 हून अधिकजण बेपत्ता

Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर : काश्मीरमधील अनेक भागात पाऊस (Rain in Kashmir) सुरू असल्याने अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही स्थगित करण्यात आली. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यामुळे यात्रेकरूंच्या कोणत्याही नवीन तुकडीला जम्मूहून पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही.

पावसामुळे दरड कोसळल्याने हा महामार्ग ठप्प झाला आहे. तत्पूर्वी, काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे अमरनाथ यात्रा शुक्रवारी दोन्ही मार्गावर थांबवण्यात आली होती आणि यात्रेकरूंना बालटाल आणि नूनवान बेस कॅम्पवर थांबवण्यात आले होते. यात्रा तात्पुरती स्थगित केल्यानंतर पहलगाम बेस कॅम्पवर गर्दी होऊ नये म्हणून 4,600 यात्रेकरूंची एक तुकडी शुक्रवारी रामबन जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गालगत चंद्रकोट येथे थांबली होती. मान्सून वारे आणि पश्चिमी विक्षोभ यांच्या प्रभावाखाली रविवारपर्यंत संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प

जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटनांनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आणि मुगल रोडवरील वाहनांची वाहतूक शनिवारी तात्पुरती थांबवण्यात आली. मेहर, कॅफेटेरिया मोर, केला मोर सीता राम पासी आणि रामबनच्या पंथियाल, काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणाऱ्या एकमेव सर्व हवामान राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या, भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या.

हिमाचलमध्ये अतिवृष्टी, कसौलीमध्ये भूस्खलन

हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे. हिमाचलच्या सोलन जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे डोची येथील रस्ता वाहून गेला. तसेच एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. कसौलीच्या एसडीएमनुसार त्यांना डोचीमध्ये रस्ता खचल्याची माहिती मिळाली होती आणि एक बांधकाम सुरू असलेले घरही कोसळले आहे.

हिमाचल प्रदेशात ऑरेंज अलर्ट

हिमाचल प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कसौली येथे दरड कोसळल्याने किमुघाट चक्की मोर रस्ताही बंद करण्यात आला आहे. पावसामुळे कालका-शिमला राष्ट्रीय महामार्गावर दगड आणि मलबा पडला आहे. काही ठिकाणी महामार्ग सिंगल लेन करण्यात आला.

Web Title: Amarnath yatra still stopped on second day due to heavy rain nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2023 | 07:16 AM

Topics:  

  • Amarnath Yatra
  • Yatra News

संबंधित बातम्या

Amarnath Yatra suspended : अमरनाथ यात्रा करु इच्छिणाऱ्यांसाठी वाईट बातमी; यंदा वेळे आधीच झाली स्थगित, नेमकं कारण काय?
1

Amarnath Yatra suspended : अमरनाथ यात्रा करु इच्छिणाऱ्यांसाठी वाईट बातमी; यंदा वेळे आधीच झाली स्थगित, नेमकं कारण काय?

लवकरच सुरु होणार अमरनाथ यात्रा, बाबा बर्फानीचे दर्शन कसं मिळणार? सर्व माहिती जाणून घ्या
2

लवकरच सुरु होणार अमरनाथ यात्रा, बाबा बर्फानीचे दर्शन कसं मिळणार? सर्व माहिती जाणून घ्या

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर परिणाम; यात्रेकरूंची नोंदणी थंडावली
3

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर परिणाम; यात्रेकरूंची नोंदणी थंडावली

Pahalgam Terror Attack: “अमरनाथ यात्रा रद्द केली…”; मंत्री पियुष गोयल यांचे महत्वाचे विधान
4

Pahalgam Terror Attack: “अमरनाथ यात्रा रद्द केली…”; मंत्री पियुष गोयल यांचे महत्वाचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.