Amarnath-Yatra
नवी दिल्ली : सध्या देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. तर काही भागांत पावसाने ओढ दिली आहे. असे असताना जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आली. याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमरनाथ गुहेत मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे शिवलिंग वेळेपूर्वी वितळले आहे. पवित्र गुहेतील बर्फ शिवलिंग पूर्णपणे वितळल्याने नवीन अमरनाथ यात्रेकरूंची निराशा झाली. गेल्या आठवडाभरात कमाल तापमानामुळे वितळण्याच्या प्रक्रियेला वेग आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमरनाथ यात्रा सुरू झाल्यानंतर सातव्या दिवशी म्हणजे 5 जुलै रोजी बाबा बर्फानी अदृश्य झाले होते. प्रथमच असे घडल्यासे सांंगण्यात येत आहे. आता येथे येणाऱ्या भाविकांना फक्त पवित्र गुहेचेच दर्शन घेता येणार आहे. या मुसळधार पावसाचा फटका आता अमरनाथ यात्रेला बसणार आहे.
ऋषिकेश ते बद्रीनाथ महामार्ग बंद
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग 107 आणि 58 रुद्रप्रयाग ते डोलिया देवीमधील गौरीकुंड आणि ऋषिकेश ते बद्रीनाथपर्यंत ब्लॉक करण्यात आले आहेत. भूस्खलनामुळे 88 ग्रामीण मोटारीयोग्य रस्ते, 2 सीमा रस्ते, एक राज्य महामार्ग आणि बद्रीनाथ मंदिराकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे.